NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

NEET 2027 Pattern Reforms: यासाठी देशभरात सुरक्षित आणि मोठ्या परीक्षा केंद्रांची पायाभूत सुविधा उभारली जात आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जेईई मेनच्या धर्तीवर नीट परीक्षा वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा आयोजित करण्याचा प्रस्ताव सुधारणा समितीसमोर आहे.
neet

neet exam

esakal

Updated on: 

NEET 2027 Exam Pattern Changes: नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे डाग पुसून काढण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संपूर्ण कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर स्थापन करण्यात आलेली हाय-पॉवर्ड टास्क फोर्स, ज्याचे नेतृत्व नंदन निलेकणी करत आहेत, ती एनटीएची यंत्रणा हायटेक आणि अचूक बनवण्यासाठी सक्रिय झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com