मायनस ४० गुण आणि शून्य टक्के असले तरी MD, MS करता येणार, NEET PG चा कटऑफ केला कमी; रिक्त जागा भरण्यासाठी निर्णय

नीट पीजी २०२५मध्ये ८०० पैकी मायनस ४० गुण मिळालेले उमेदवारही पदव्युत्तर मेडिकल कोर्सेस एमडी आणि एमएस या अभ्यासक्रमासाठी काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राउंडमध्ये भाग घेऊ शकतात.
Doctor

Doctor

Esakal

Updated on

NEET PG 2025 Allows MD MS Admission Even With Minus 40 Marks देशात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने नीट पीजी २०२५साठी पात्रता कटऑफ कमी केला आहे. सुधारित निकषांनुसार आता खुल्या वर्गासाठी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी पात्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी करून ७ टक्के केलीय. तर एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी ४० टक्क्यांवरून ० करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या जनरल कॅटेगरीसाठी ४५ टक्क्यांवरून ५ टक्के केली आहे. नीट पीजी २०२५ काउन्सिलिंगचे दोन राउंड झाल्यानंतर सरकारी आणि खासगी वैद्यकीय कॉलेजमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त पीजीच्या जागा रिकाम्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com