esakal | NEET UG परीक्षेसाठी 'Application Form' लवकरच होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

NEET UG

राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीसाठी (NEET UG 2021) लवकरच अर्ज प्रसिद्ध केले जाणार आहेत.

NEET UG परीक्षेसाठी 'Application Form' लवकरच होणार जाहीर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

NEET UG 2021 : राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीसाठी (NEET UG 2021) लवकरच अर्ज प्रसिद्ध केले जाणार आहेत. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) 'नीट यूजी'करिता neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटही सुरू केलीय. या नवीन संकेतस्थळावर लवकरच NEET परीक्षेचा अर्ज उपलब्ध करुन देण्याची माहिती देण्यात आलीय. (neet ug 2021 application form for neet ug exam to be released soon nta launched official website)

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) एनटीएतर्फे 1 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात 12 मार्च 2021 रोजी एक नोटीस देखील nta.ac.in च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलीय. दरम्यान, आता नीटसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. तसेच एनईईटीचा अर्ज प्रसिद्ध झाल्यानंतर, पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी नोंदणी करू शकतील.

हेही वाचा: ऑफिसर ग्रेड-बी फेज 2 परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result

नीटची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन दिली जाणार असून यात बुलेटिनच्या माध्यमातून उमेदवारांना अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, जागा वर्गीकरण, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर, राज्य कोड इत्यादी परीक्षेशी संबंधित सविस्तर माहिती मिळू शकणार आहे. नीट यूजी परीक्षा ही MBBS, BDS अभ्यासक्रम तसेच BAMS, BHMS, BUMS आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. या वेळी ही प्रवेश परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण 11 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

neet ug 2021 application form for neet ug exam to be released soon nta launched official website