esakal | NEET UG 2021 च्या परीक्षेसाठी अर्जाची तारीख वाढवली; जाणून घ्या शेड्युल
sakal

बोलून बातमी शोधा

NEET UG

नॅशनल टेस्टिंग एजन्सने NEET किंवा NEET UG 2021 च्या पदवी अंडर ग्रॅज्युएट परीक्षेसाठी अर्जाची तारीख वाढवली आहे.

NEET UG 2021 च्या परीक्षेसाठी अर्जाची तारीख वाढवली; जाणून घ्या शेड्युल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नॅशनल टेस्टिंग एजन्सने NEET किंवा NEET UG 2021 च्या पदवी अंडर ग्रॅज्युएट परीक्षेसाठी अर्जाची तारीख वाढवली आहे. आता या परीक्षेसाठी 10 ऑगस्ट 2021 पर्यंत सांयकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी neet.nta.nic या संकेतस्थळावर अधिकृत आणि सविस्तर माहिती मिळेल. तसंच संकेतस्थळावर अर्जही करता येणार आहे.

एनटीएकडून ही घोषणा अशा विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे ज्यांना काही कारणांनी NEET (UG) 2021 परीक्षेसाठी अर्ज करता आलेला नाव्हता. आता अशा विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. वाढवण्यात आलेली तारीख बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू आहे. या तारखेसह अर्जाच्या करेक्शनच्या तारखेतसुद्धा बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा: TET परीक्षेची नोंदणी सुरु; कुठे अन् कसा कराल अर्ज?

NEET UG 2021 - नवीन शेड्युल

NEET UG 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2021, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

NEET UG 2021 अर्जाचे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2021, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

अर्जात दुरुस्ती कऱण्यासाठीच्या विंडोंसाठी तारीख - 11 ऑगस्ट 2021 ते 14 ऑगस्ट 2021

हेही वाचा: संधी करिअरच्या... : बारावीनंतर ‘बी व्होक’ पदवी

उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करण्याचा पर्याय हा ऑप्शनल आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की, त्यांच्या फॉर्ममध्ये करेक्शन करण्याची गरज आहे त्यांना वापर करता येईल. तसंच अर्जात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येतील.

DGHS च्या शिफारसीनंतर निर्णय

NTA ने हा निर्णय आरोग्य विज्ञान महासंचालनालय तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या शिफारसीनंतर घेतला आहे. NEET (UG) 2021 च्या निकालासंदर्भात हे करण्यात आलं होतं. याचा निकाल बीएससी (ऑनर्स) नर्सिंगला प्रवेशासाठी उपयोगी पडणार आहे.

loading image
go to top