

neet exam result
esakal
NEET UG 2026 Result Declared: पेपरफुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री लागला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपर फुटीच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच शिफ्टमध्ये ही फेरपरीक्षा दिली होती.