
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG चा निकाल जाहीर केला आहे.
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency NTA) बुधवारी (7 सप्टेंबर) देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2022 चा निकाल जाहीर केला. वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या 17.64 लाख उमेदवारांच्या यादीत राजस्थानमधील (Rajasthan) तनिष्का अव्वल ठरलीय.
दिल्लीचा वत्स आशिष बत्रा, कर्नाटकचा (Karnataka) नागभूषण गंगुले आणि रुचा पावाशे चौथ्या क्रमांकावर आहेत. राजस्थानची टॉपर तनिष्का आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी 715 गुण मिळवले आहेत. देशभरातील टॉप-50 उमेदवारांमध्ये 18 मुली तर 32 मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
रँक 1 : राजस्थानची तनिष्का 99.9997733 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
रँक 2 : दिल्लीचा वत्स आशिष बत्रा 99.9997733 म्हणजेच, 715 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रँक 3 : कर्नाटकचा हृषीकेश नागभूषण गंगुले 99.9997733 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रँक 4 : कर्नाटकातील रुचा पावाशे हिनं 99.997733 किंवा 715 गुण मिळवले आहेत.
रँक 5 : तेलंगणाचा इराबेली सिद्धार्थ राव 99.9997166 किंवा 711 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
रँक 6: महाराष्ट्रातील ऋषी विनय बालसे 99.9992066 किंवा 710 गुणांसह अव्वल 6 मध्ये आहे.
रँक 7: पंजाबची अर्पिता नारंगनं 99.992066 किंवा 710 गुण मिळवले आहेत.
रँक 8 : कर्नाटकच्या कृष्णा एसआरनं 710 गुण मिळवले आहेत.
रँक 9 : गुजरातमधील जील विपुल व्यासनं 710 गुण मिळवले आहेत.
रँक 10 : जम्मू-काश्मीरमधील हाजिक परवीझ लोननंही 710 गुण मिळवले आहेत.
रँक 1 : तनिष्क
रँक 4 : रुचा पावाशे
रँक 9 : जील विपुल व्यास
रँक 11 : सयंतनी चटर्जी
रँक 14 : अनुष्का मंडल
रँक 15 : नुनी वेंकट साई वैष्णवी
रँक 17 : शुभा कौशिक
रँक 21 : वैदेही झा
रँक 22 : देबंकिता बेरस
रँक 23 : मुरिकी श्री बरुनी
रँक 24 : अनुष्का आनंद कुलकर्णी
रँक 29 : सानिका अग्रवाल
रँक 31 : पटेल हॅले मेहुलभाई
रँक 37 : चप्पिडी लक्ष्मी चरित
रँक 38 : निशा
रँक 43 : एम. हरिणी
रँक 47 : नंदिता पी
रँक 50 : वरुम अधिथी
रँक 51 : जान्हवी बनोत्रा
रँक 52 : चांडाल यशस्विनी श्री
NEET परीक्षेला बसलेल्या 7,63,545 पैकी 4,29,160 मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर 10,01,015 पैकी 5,63,902 मुलींनी NEET-UG 2022 ची परीक्षा उत्तीर्ण केलीय. 17 जुलै रोजी पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा झाली. देशातील 497 शहरं आणि भारतातील 14 शहरांमध्ये झालेल्या 3,570 केंद्रांवर या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.