student self esteem in education system

student self esteem in education system

sakal

NEP 2020 : आत्मसन्मानाकडे वाटचाल

student self esteem in education system : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि जबाबदारी विकसित करण्यासाठी शाळांनी सकारात्मक मूल्यमापन, प्रोत्साहनात्मक शिक्षण, सहभागाधारित संधी आणि मूल्यशिक्षणावर भर द्यावा, असे मत डॉ. मिलिंद नाईक यांनी व्यक्त केले.
Published on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य- ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

शारीरिक, सुरक्षिततेच्या आणि मानसिक-सामाजिक गरजा या पहिल्या तीन गरजा समाधानकारकरीत्या पूर्ण झाल्यानंतर माणसामध्ये पुढील चौथ्या टप्प्यावरची महत्त्वाची गरज निर्माण होते ती आत्मसन्मानाची. मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या सिद्धांतानुसार, मानवी जीवनात सन्मानाच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. या टप्प्यावर इतरांकडून मिळणाऱ्या सन्मानावर अवलंबून न राहता व्यक्ती स्वतःला स्वतःकडून सन्मान देते. ही चौथ्या पायरीची गरज पूर्ण झाली तरच व्यक्ती त्या पुढील पाचव्या टप्प्याकडे, म्हणजेच आत्मविकासाकडे वाटचाल करू शकते. या आत्मसन्मानाच्या गरजा पूर्ण होण्याची पहिली सामाजिक जागा म्हणजे शाळा होय! राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये सुचवलेले विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्व, प्रयत्न, प्रगती, शिस्त, सहकार्य, सातत्य आणि सकारात्मक वृत्ती इ. निकषांच्या आधारे ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ हे या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com