esakal | सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! यूपीएससीकडून नवी अधिसूचना जाहीर

बोलून बातमी शोधा

UPSC Commission
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! यूपीएससीकडून नवी अधिसूचना जाहीर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : संघ लोकसेवा आयोग, यूपीएससीने आयोगाच्या परीक्षांसाठी निरीक्षकांचे पॅनेल गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासकीय सेवानिवृत्त अधिकारी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरती जाऊन (upsc.gov.in) या पदासाठी अर्ज करू शकतात. याबाबतची अधिकृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली येथील यूपीएससीच्या परीक्षागृहात आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी निरीक्षकांचे पॅनेल नेमले जाणार आहे. अधिकृत माहितीनुसार, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा 65 वर्षाखाली असावी, तरच ते या पदासाठी अर्ज करु शकतात, असे नमूद केले आहे.

परीक्षेतील कर्तव्याचा अनुभव असलेले पात्र उमेदवार वरील पत्त्यावर पीपीओ, आयडी प्रूफसह त्यांचे नाव, बायोडेटा पाठवून पदासाठी अर्ज करु शकतात. पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे. याबाबतची अधिक माहिती https://upsc.gov.in/content/formation-panel-supervisors-commission-examinations. या वेबसाइटवरती उपलब्ध करण्यात आली आहे.

दहावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; तब्बल 1074 पदांसाठी सरकारी नोकर्‍या, दरमहा 1.60 लाखांपर्यंत पगार

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी 'या' वापरा सोप्या टिप्स

  • सर्व प्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in भेट द्या.

  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर आपल्याला पॅनेल पर्यवेक्षकाच्या निर्मितीसाठीचा एक दुवा दिसेल. Formation of panel supervisor यावर क्लिक करा.

  • क्लिक केल्यानंतर, एक पीडीएफ फाइल आपल्यासमोर स्क्रीनवर ओपन होईल.

  • ती डाउनलोड करा आणि आता आपल्याला हा फॉर्म भरावा लागेल व तो येथे दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.