
NMMS Exam
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता ही परीक्षा २८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.