MPSC Exam Issue : दोन वर्षांत एकही परीक्षा सुरळीत नाही; नियुक्त्या रखडल्या, परीक्षा पुढे ढकलल्या

एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा, रखडलेले निकाल आणि नियुक्त्यांवरील चौकशी यांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य झाले अधांतरी.
mpsc exam

mpsc exam

esakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा, रखडलेले निकाल आणि नियुक्त्यांवरील चौकशी यांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी झाले आहे. गेल्या दोन वर्षात एकही परीक्षा सुरळीत पार पडलेली नाही. तसेच आगामी दोन महिने कोणत्याही परीक्षेचे नियोजन नाही. त्यामुळे परीक्षांची प्रतीक्षा, वाढते वय, अभ्यासाचा खर्च आणि मानसिक ताण यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरमध्ये पुण्यात ११ दिवस आंदोलन केले. मात्र, परीक्षा व निवड प्रक्रियेतील अनिश्चितता कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com