'आर्मी टेक्‍निकल ग्रॅज्युएट कोर्स 135' भरतीसाठी अधिसूचना जारी!

आर्मी टेक्‍निकल ग्रॅज्युएट कोर्स 135 भरतीसाठी अधिसूचना जारी! अर्ज प्रक्रिया झाली सुरू
Indian Army
Indian Armyesakal
Summary

भारतीय लष्कराच्या टेक्‍निकल कोअरमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे.

सोलापूर : भारतीय लष्कराच्या (Indian Army) टेक्‍निकल कोअरमध्ये सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. जुलै 2022 पासून सुरू होणाऱ्या भारतीय लष्कराच्या टेक्‍निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 135) (Technical Graduate Course (TGC 135)) साठी 6 डिसेंबर 2021 पासून अर्ज केले जाऊ शकतात. आर्मी TGC 135 साठी आर्मीने जारी केलेल्या आर्मी TGC 135 अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 6 डिसेंबर 2021 दुपारी 3 ते 4 जानेवारी 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.

Indian Army
DRDO DEAL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

भारतीय सैन्यदलाद्वारे टेक्‍निकल कोअरमध्ये भरतीसाठी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तांत्रिक प्रवेश योजना (TES) आणि पदवीधर उमेदवारांसाठी तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC) आयोजित केला जातो. नवीनतम TES-46 साठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालली असताना, TGC 135 साठी अर्ज 6 डिसेंबरपासून सुरू होण्याची घोषणा लष्कराकडून करण्यात आली होती.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

जुलै 2022 मध्ये सुरू होणाऱ्या आर्मी TGC 135 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार इंडियन आर्मीच्या अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना पोर्टलवरील ऑफिसर्स एंट्री विभागात प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर उमेदवारांना त्यांचा अर्ज सबमिट करण्यासाठी त्याच्या तपशिलाद्वारे लॉग इन करावे लागेल.

Indian Army
आता पोस्टपेड प्लॅन्सही होणार महाग! 'या' कंपन्यांची तयारी सुरू

आर्मी TGC 135 साठी पात्रता

भारतीय लष्कराने यापूर्वी आयोजित केलेल्या TGC भरती प्रक्रियेच्या सूचनेनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात; परंतु त्यांना 1 जुलै 2022 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल, जो उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून 12 आठवड्यांच्या आत सादर करावा लागेल. याशिवाय, अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेनुसार म्हणजे 1 जुलै 2022 रोजी उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com