esakal | बीईएलमध्ये 'या' पदांसाठी भरती; 9 जूनपर्यंत करु शकता अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

BEL

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BEL) संरक्षण मंत्रालयांतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता व प्रकल्प अभियंता पदावरील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

बीईएलमध्ये 'या' पदांसाठी भरती; 9 जूनपर्यंत करु शकता अर्ज

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Bharat Electronics Limited Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BEL) संरक्षण मंत्रालयांतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता (trainee engineers) व प्रकल्प अभियंता (project engineers) पदावरील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 9 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंताची 6 आणि प्रकल्प अभियंताची 3 पदे भरली जाणार आहेत, तर ही भरती एसबीयू बेंगलुरू कॉम्प्लेक्स, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड अनमाईंड सिस्टममधील कराराच्या आधारे केली जाणार आहे. (notification-of-bharat-electronics-limited-recruitment-2021-out-for-trainee-engineers-and-project-engineers)

प्रशिक्षणार्थी अभियंता पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराने एअरोस्पेस / एअरोनॉटिकलमध्ये बीई / बीटेक / बीएससी-अभियांत्रिकी (4 वर्षे) पदवी असणे आवश्यक आहे. तर प्रकल्प अभियंतासाठी एअरोस्पेस / एअरोनॉटिकलमध्ये बीई / बी. टेक / बीएससी अभियांत्रिकी (4 वर्षे) व एमई / एमटेक पदवी असणे आवश्यक आहे. याची वयोमर्यादा प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, प्रकल्प अभियंतासाठी 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

प्रशिक्षणार्थी अभियंत्याला पहिल्या वर्षात महिन्याला 25,000, तर दुसर्‍या वर्षी हा पगार 28,000 आणि तिसर्‍या वर्षात 31,000 रुपयांनी वाढणार आहे. त्याचबरोबर प्रकल्प अभियंत्याला पहिल्या वर्षात महिन्याला 35,000 रुपये पगार मिळेल. दुसर्‍या वर्षी 40,000, तिसर्‍या वर्षात 45,000 आणि चौथ्या वर्षात 50,000 रुपये महिना पगार मिळणार आहे.

हेही वाचा: 'DRDO'मध्ये 'या' पदांसाठी भरती; महिन्याला मिळणार 31000 पगार

बीईएल भरतीसाठी उमेदवार आपला अर्ज 9 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी मॅनेजर (एचआर / एससी आणि यूएस), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली, बंगलोर 560013 यावर पाठवू शकतात. अर्ज फी प्रशिक्षणार्थी अभियंतासाठी 200 रुपये, तर प्रकल्प अभियंतासाठी 500 रुपये असेल.

notification of bharat electronics limited recruitment 2021 out for trainee engineers and project engineers