Career Opportunities in Nursing
Sakal
एज्युकेशन जॉब्स
नर्सिंगमधील संधी
नर्सिंग हे रोजगारक्षम आणि मागणी असलेले क्षेत्र आहे, जिथे विविध कोर्सेस (ANM, GNM, BSc, MSc) घेऊन करिअर तयार करता येते. नर्सेसना रुग्णकाळजी, वैद्यकीय सहाय्य, विशेष विभागात कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते.
प्रा. सुभाष शहाणे (सहायक प्राध्यापक)
विशेष
सध्या नर्सिंग क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्यांना कायम रोजगार उपलब्ध असतो. नर्सेसची देशात व परदेशात भरपूर मागणी आहे. सरकारी व खासगी रुग्णालये, महानगरपालिका, रेल्वे, नर्सिंग स्कूल व महाविद्यालये, संशोधन संस्थांमधून नर्सेसला प्रचंड मागणी आहे.

