Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन
TCS Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) मध्ये गट ‘ड’च्या ३५७ पदांसाठी १.१५ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले. ऑनलाइन परीक्षा २५, २६ आणि २८ ऑगस्ट रोजी राज्यातील ११ शहरांमध्ये घेतली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) येथे गट ‘ड’च्या ११ संवर्गातील ३५७ पदांसाठी राज्यभरातून तब्बल १.१५ लाखाहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले. त्यापैकी छाननीअंती ३२ हजार ४४० उमेदवारांना परीक्षेची संधी दिली.