One Nation, One Subscription : एक देश, एक सदस्यता योजना १ जानेवारीपासून सुरू; १.८ कोटी विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?
एक देश, एक सदस्यता (ओ.एन.ओ.एस) योजना इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क या केंद्रीय संस्थेमार्फत राबवली जाणार आहे. ही संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) स्वायत्त शाखा आहे.
वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ (ओ.एन.ओ.एस) या सरकारी उपक्रमामुळे 1 जानेवारीपासून देशभरातील विद्यापीठे,आयआयटी यांसारख्या सरकारी मदतीच्या उच्च शिक्षण संस्थांमधील सुमारे 1.8 कोटी विद्यार्थ्यांना जगभरातील नामांकित जर्नल्समधील संशोधन लेख वाचता येणार आहेत.