
छत्रपती संभाजीनगर : शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वास्तव धक्कादायक असून जिल्ह्यातील तब्बल १२ शाळांमध्ये सध्या केवळ एकेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे, अशी माहिती समोर आली असून शिक्षण विभागाच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.