पाबळ - अकरावीच्या सन २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया अडथळा ठरत आहे. महिना उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.