पीएमएसएस अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने माजी सैनिक, तटरक्षक दलातील माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेची (पीएमएसएस) सुविधा देण्यात येत आहे.
online
onlinesakal
Summary

माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने माजी सैनिक, तटरक्षक दलातील माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेची (पीएमएसएस) सुविधा देण्यात येत आहे.

पुणे - माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने माजी सैनिक, तटरक्षक दलातील माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेची (पीएमएसएस) (PMSS) सुविधा (Facility) देण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Form Process) सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

ही योजना लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांना व त्यांच्या विधवांना वगळता माजी सैनिक किंवा सैनिकांच्या विधवांच्या मुलांना उच्च तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत मुलींना प्रत्येक महिन्याला ३००० हजार तर मुलांना २५०० रुपयांची मदत केली जाणार आहे.

ही शिष्यवृत्ती बारावीचे शिक्षण पूर्ण करत २०२१ ते २२ या शैक्षणिक वर्षातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये पदव्युत्तर पदवीसाठी एमबीए, एमसीए या अभ्याक्रमासाचा समावेश आहे. तर, पदवी अभ्यासक्रमासाठी बी.ई, बी. टेक, बी.डी.स, एमबीबीएस, बी फार्मा, बी.सी.ए, बी.बी.ए, बी.एस्सी नर्सिंग, बी आर्किटेक्चर, बी.बी.एम., बी.एस्सी बायोटेक, एल.एल.बी., बी.पी.एड., बॅचलर ऑफ फिशरी सायन्स, बीएस्सी ऍ़ग्री, एमबीए व एमसीए मध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी बारावीमध्ये विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. तसेच पदवीचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी ५० टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा ही शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल. असे ही माजी सैनिक कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

online
तरुणांना जॉबची सुवर्णसंधी! फेअरपोर्टलचे कार्यालय आता पुण्यात

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड, माजी सैनिक/माजी तटरक्षक सैनिक प्रमाणपत्र (ANNEXURE 1), बँक खाते पासबुक, इंटर सर्टिफिकेट, ईएसएम प्रतिज्ञापत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेट, नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र.

‘पीएमएसएस’साठी असा करा अर्ज -

- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http // www.desw.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी

- होम पेजवर, ‘पीएमएसएस’च्या पर्यायावर क्लिक करा

- त्यानंतर ‘नवीन अर्जा’च्या पर्यायावर क्लिक करा

- यावर नव्या अर्जासंबंधी नोंदणी फॉर्म स्क्रीनवर दिसून येईल

- सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून अर्ज दोना भागात भरावे लागतील

- अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com