अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online-Admission

यंदा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

पुणे - तुम्ही ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या निकालानंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात का! मग इकडे लक्ष द्या. राज्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये यांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यंदा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

होय, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ई आणि बी.टेक) पहिल्या वर्षाच्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- इंटिग्रेटेड पाच वर्ष) प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

यंदा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते  २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती ‘सीईटी सेल’तर्फे देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘fe2022mahacet.org’ संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच विद्यार्थी-पालकांनी अधिक माहितीसाठी ‘https://cetcell.mahacet.org/’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक (बी.ई/बी.टेक आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) :

तपशील : कालावधी

- ऑनलाइन नोंदणी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - ४ ऑक्टोबरपर्यंत (दुपारी ४ वाजेपर्यंत)

- कागदपत्रांची पडताळणी, प्रवेशासाठी अर्ज निश्चिती करणे : ४ ऑक्टोबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)

- तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : ७ ऑक्टोबर

- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे : ८ ते १० ऑक्टोबर

- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : १२ ऑक्टोबर

पहिली फेरी

- ‘कॅप’अंतर्गत पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागा दर्शविणे : १२ ऑक्टोबर

- या फेरीअंतर्गत ऑनलाइन अर्ज करणे, अर्ज निश्चिती करणे, पसंतीक्रम नोंदविणे : १३ ते १५ ऑक्टोबर

- प्रवेशासाठी निवड झालेल्यांची यादी जाहीर करणे : १८ ऑक्टोबर

- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी, तसेच शुक्ल भरून विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे : १९ ते २१ ऑक्टोबर

दुसरी फेरी

- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील दर्शविणे : २२ ऑक्टोबर

- प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे, निश्चित करणे, पसंतीक्रम नोंदविणे : २३ ते २६ ऑक्टोबर

- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे : २८ ऑक्टोबर

- प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत : २९ ते ३१ ऑक्टोबर

तिसरी फेरी

- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १ नोव्हेंबर

- प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करणे, निश्चित करणे, पसंतीक्रम नोंदविणे : २ ते ४ नोव्हेंबर

- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे : ६ नोव्हेंबर

- प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत : ७ ते ९ नोव्हेंबर

Web Title: Online Registration For Admission To Engineering And Technology Courses Has Started Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..