11th Class Admission : राज्यातील २१ लाखांहून अधिक अकरावीच्या जागांपैकी ८.८२ लाख प्रवेश निश्चित; खुल्या फेरीकरिता आजच भरा अर्ज
11th Class Vacant Seats : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुली’ फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम संधी मिळणार आहे.
Number of seats filled in 11th admission 2025esakal
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार नियमित फेऱ्यांनंतर आता सर्वांसाठी खुली फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीत विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. ५) महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम आणि अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.