मुक्त विद्यापीठाच्या बीए, बीकॉम ऑनलाईन परीक्षा वेळापत्रकात बदल

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
Yashwantrao Chavan Maharashtra Open UniversityGoogle

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) बी. ए. (BA) आणि बी. कॉम.च्या (BCom) पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून परीक्षा दोन भागात होतील. ऑगस्टमधील परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होतील.


बी. ए. आणि बी. कॉमच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. त्याऐवजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरला, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या विभागीय केंद्रात ४ सप्टेंबरपासून परीक्षा सुरु होतील. द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकात काही बदल असून, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी ही माहिती दिली. तुकडी क्रमांक एक : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश. तुकडी क्रमांक दोन : नाशिक, नगर, धुळे, जळगांव, नंदूरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
सावधान! ग्रामीण भागात हळूहळू वाढतेय बाधितांची संख्या


विद्यार्थ्यांनी आपली तुकडी किती तारखेला आहे, ते काळजीपूर्वक तपासून त्याचदिवशी त्या विषयाची परीक्षा वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेमध्ये द्यावी. बी. ए., बी. कॉमच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या काही विषयांसाठी विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत पेपर देता येऊ शकेल. काही विषयांसाठी संख्या कमी असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ अथवा दुपारी ३ ते रात्री ८ अशी पेपरची वेळ असेल. तुकडी निहायपरीक्षा बी.ए. दुसऱ्या वर्षासाठी पर्यावरणशास्त्र या विषयाची परीक्षा पहिली व दुसरी तुकडी अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्टला असेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तुकडीनिहाय परीक्षा नसेल. मात्र ‘स्लॉट टाईम' विद्यार्थी संख्येनुसार काही विषयांना सकाळी ८ ते रात्री ८ असा असेल. विद्यार्थ्यांनी आपण देणार असलेल्या पेपरची वेळ काळजीपूर्वक पाहून त्यानुसारच ऑनलाईन परीक्षेला उपस्थित होउन परीक्षा द्यावी. परीक्षांबाबतचे सविस्तर वेळापत्रक ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात ८० रुग्ण कोरोना बाधित


ऑनलाईन परीक्षा चांगली देता यावी यासाठी विद्यापीठाने https://ycmou.unionline.in संकेतस्थळावर १ ऑगस्टपासून सराव चाचणी (मॉक टेस्ट) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ ९ ऑगस्टपर्यंत घेता येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सराव चाचणी आवश्य द्यावी, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत.
- भटुप्रसाद पाटील (परीक्षा नियंत्रक)


मुक्त विद्यापीठात ऑगस्ट २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १२१ शिक्षणक्रमाचे १ हजार ३७६ अभ्यासक्रम असून सुमारे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकाचवेळी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाहून अधिक आहे. अधिक विद्यार्थी संख्या असल्याने परीक्षेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत, परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून एकाच विषयाची परीक्षा विभागनिहाय दोन दिवस ठेवली आहे. विद्यापीठच्या आठ विभागीय केंद्रांचे दोन गट करण्यात आले असून त्या दोन गटांतर्गत परीक्षा दोन दिवस घेण्यात येतील.
- डॉ. दिनेश भोंडे (कुलसचिव, मुक्त विद्यापीठ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com