महिलांना भारतीय सैन्यात सेवा देण्याची संधी; या अभ्यासक्रमाला घ्या प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army B.Sc Nursing

महिलांना भारतीय सैन्यात सेवा देण्याची संधी; या अभ्यासक्रमाला घ्या प्रवेश

मुंबई : वैद्यकीय शिक्षण महासंचालनालयाने (DGMS) Indian Army B.Sc Nursing 2022साठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नीट २०२२साठी अर्ज केलेल्या महिलाच अर्ज करू शकतात. नीटमधील गुणांच्या आधारेच परिचारिका महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

लवकरच बीएससी नर्सिंगसाठी प्रवेश परीक्षा जाहीर केली जाईल. ४ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देशभरातील २२० जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे नोंदणी करावी.

शैक्षणिक पात्रता

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून ५० ट्क्क्यांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

वय

उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९७ ते ३० सप्टेंबर २००५ या कालावधीत झालेला असणे आवश्यक असते.

शारीरिक पात्रता

सशस्त्र दलांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांची उंची १५२ सेमी असणे आवश्यक असते. डोंगराळ भागातील आणि ईशान्येकडील महिलांना सूट देण्यात आली आहे. या भागांतील महिलांसाठी उंचीची मर्यादा १४७ सेमी आहे.

निवडप्रक्रिया

१. नीटमधील गुणांच्या आधारे प्राथमिक निवड

२. कागदपत्र तपासणी

३. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी

४. मानसशास्त्रीय मूल्यांकन चाचणी

५. मुलाखत

६. वैद्यकीय परीक्षा

प्रवेश घेताना उमेदवारांना एका करारावर सही करणे बंधनकारक असेल ज्यात लिहिले असेल की त्या लष्करात वैद्यकीय सेवा देतील. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत किराणा, गणवेश खर्च आणि विद्यावेतन दिले जाईल.