भारतीय सैन्यात 'अधिकारी' होण्याची संधी; भरतीसाठी आजच करा अर्ज I Indian Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

भारतीय सैन्यात 'अधिकारी' होण्याची संधी; भरतीसाठी आजच करा अर्ज

Indian Army SSC Recruitment 2021 : भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. सैन्यातील रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्सने (RVC, Remount Veterinary Corps) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत पुरुष पशुवैद्यकीय पदवीधरांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. दरम्यान, ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची वयोमर्यादा 21 ते 32 वर्षे निश्चित करण्यात आलीय. याबाबत joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर Notification ही जारी करण्यात आले आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराकडे BVSc/BVSc आणि AH पदवी किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदवी मिळवणं आवश्यक आहे. शिवाय पशुवैद्यकीय पात्रता देखील असणं गरजेचं आहे. निवडलेल्या उमेदवारांची कॅप्टन पदावर भरती केली जाईल. उमेदवारांना RVC सेंटर आणि कॉलेज, मेरठ कॅंट येथे पोस्ट कमिशन प्रशिक्षण देखील घ्यावं लागेल. कमिशन केलेले अधिकारी 5 वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात सेवा करतील. त्यांच्या कामगिरीच्या आधारे 5 वर्षानंतर सेवेचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो.

हेही वाचा: CRPF मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

उमेदवारांना 61,300 रुपये पे-मॅट्रिक्सवर भरती केलं जाईल. याशिवाय उमेदवारांना सेवा वेतन, नॉन प्रॅक्टिस भत्ता, देखभाल भत्ता आणि महागाई भत्ताही दिला जाईल. उमेदवारांना सवलतीचे निवास, मोफत रेशन, स्वत:साठी आणि कुटुंबासाठी मोफत आरोग्य लाभ, एलटीसी, 60 दिवसांची वार्षिक रजा आणि 20 दिवसांची कॅज्युअल रजा यासह कॅन्टीन व गट विमा संरक्षणही मिळेल. याबाबतची अधिक माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आलीय.

loading image
go to top