Income Tax Department: दहावी उत्तीर्ण अन् पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आयकर विभागाने रिक्त जागा काढली आहे.
Sarkari Naukri
Sarkari Naukriesakal
Summary

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आयकर विभागाने रिक्त जागा काढली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आयकर विभागाने (Income Tax Department) रिक्त जागा काढली आहे. या रिक्त जागा दहावी आणि पदवीधर उत्तीर्ण युवकांसाठी आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या या विभागात आयकर निरीक्षक, कर सहाय्यक मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण पदांची संख्या 24 आहे.

Sarkari Naukri
10वी पास उमेदवारांना परिक्षेशिवाय नोकरीची संधी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

आयकर विभागाच्या या भरतीशी संबंधित पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष इच्छुक उमेदवार www.incometaxindia.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासू शकतात. विभागाच्या या रिक्त जागांसाठी उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. ही सर्व पदे स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत भरली जाणार आहेत.

आवश्यक पात्रता आणि कागदपत्रांची गरज

कर सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, डेटा एन्ट्री स्पीड प्रति तास 8000 की-डिप्रेशन असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डाकडून बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष सविस्तर माहितीचा विभागीय जाहिरातीत अभ्यास करता येईल. MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ पद मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.

Sarkari Naukri
10वी, ITI पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; ८१००० पगार, लवकर भरा अर्ज

आवश्यक कागदपत्रांबाबत उमेदवारास पात्रता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मूळ रहिवासी दाखला, स्वातंत्र्यसैनिक अवलंबित प्रमाणपत्र व माजी सैनिक प्रमाणपत्र यांची छायाप्रत ऑफलाइन अर्ज भरताना व पडताळणीच्या वेळी सादर करावी लागते. इंटरव्यू/ कौशल्य चाचणीच्या वेळी उमेदवाराने खालील नोंदींच्या मूळ प्रतीसह उपस्थित राहणे बंधनकारक असते.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे सिलेक्शन

उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, पात्रता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी

सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवाराला नियमानुसार सूट मिळणार आहे. सहाव्या वेतन आयोगांतर्गत या पदांसाठी वेतन मिळणार आहे.

Sarkari Naukri
CISF मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याला मिळणार 'इतका' पगार

पदांची नावे आणि संख्या

- रिक्त पदांची संख्या - 24 जागा

- आयकर निरीक्षक - 01

- कर सहायक - 05

- मल्टी टास्किंग स्टाफ - 18

महत्त्वाची तारीख

- अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 मार्च 2022

- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्जाचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त, मुख्यालय (कार्मिक व आस्थापना), पीआय मजला, कक्ष क्रमांक 14, आयकर भवन, पी-7, चौरंगी चौक, कोलकाता 700069.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com