तुमची मुलंदेखील College मध्ये जाणार आहेत? मग या ५ गोष्टी त्याना नक्की समजवा

महाविद्यालय ही एक अशी पायरी आहे की जिथं तुमचं मुलं भरकटण्याची देखील शक्यता असते. या पायरीवर त्याच मनोबल खचलं तर पुढे भविष्यात नुकसान होऊ शकतं. यासाठीच मुलं कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं
मुलांना काॅलेजमध्ये पाठवताना
मुलांना काॅलेजमध्ये पाठवतानाEsakal

शिक्षणामुळे जीवनाला आकार मिळतो. शिक्षणामुळे Education जीवन प्रकाशमान होतं. शिक्षणामुळे समाज घडतो. म्हणून एक आदर्श जीवन जगण्यासाठी आणि आदर्श समाजासाठी शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. शाळा School ही प्रत्येक मुलासाठी शिक्षणाची पहिली पायरी असते. Parenting Tips Educate your Child before entering into the college

तिथे शिक्षणाचा पाया मजबूत केला जातो. तर कॉलेज हे त्याच्या भविष्यासाठी पुढे नेणारी महत्वाची पायरी आहे. कॉलेज किंवा महाविद्यालयाची College पायरी चढत असताना मुलांना जागरुक राहणं गरजेचं असतं. या पायऱ्यांमुळेच पुढे त्यांच्या यशाची Success दारं उघडी होणार असतात.

मात्र महाविद्यालय ही एक अशी पायरी आहे की जिथं तुमचं मुलं भरकटण्याची देखील शक्यता असते. या पायरीवर त्याच मनोबल खचलं तर पुढे भविष्यात नुकसान होऊ शकतं. यासाठीच मुलं कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

कॉलेजमध्ये मुलं कुणासोबत वावरतात म्हणजेच त्यांची संगत कशी आहे. तो कोणत्या उपक्रमांमध्ये भाग घेतोय, त्याने कसं रहावं याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये जाण्याचं वय हे तारुण्यातील नाजूक वय असतं. प्रत्येक पालकालाच आपल्या मुलाने चांगलं शिकून मोठं व्हावं असं वाटतं असतं. यासाठीच कॉलेजमध्ये मुलं जाण्याआधीच पालकांनी त्यांना काही गोष्टी समजावणं गरजेचं आहे.

१. कॉन्फिडंस- कोणत्याही कामाची सुरुवात करताना कॉन्फिडंस म्हणजे आत्मविश्वास दृढ असणं गरजेचं आहे. चांगला आत्मविश्वास असेल तर प्रत्येक कामात यश मिळतं. यासाठी कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या मुलाला कायम आत्मविश्वास चांगला ठेवण्याचा सल्ला द्या.

अनेकदा काही महाविद्यालयांमध्ये रॅगिंग किंवा नव्या विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कृतींना घाबरून न जाता हाय कॉन्फिडंसने त्याला नकार द्यायला शिका. काही वेळेस इतर विद्यार्थांना पाहूनही काही मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा वेळी प्रत्येकामध्ये काही ना काही खास गुण असतात तसे तुझ्यातही आहेत असं सांगून त्याचा आत्मविश्वास वाढवा.

हे देखिल वाचा-

मुलांना काॅलेजमध्ये पाठवताना
Maharashtra Top Colleges : या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली की लाइफ सेट

२. इतर विद्यार्थांशी तुलना- कॉलेजमध्ये गेल्यावर मुलांसाठी एक नवं जग खुलं होतं. अशावेळी अनेकदा इतर मुलांकडे पाहून त्यांच्याशी तुलना करून मुलं भरकटू शकतात. जास्त गुण असलेल्या मुलांकडे पाहून त्यांचा आत्मविश्वास कमी होवू शकतो

तसंच जास्त श्रीमंत मुलांकडील महागड्या वस्तूं किंवा इतरांच्या राहणीमानाचा त्यांच्यावर प्रभाव पडू शकतो. यासाठी त्यांना कॉलेज हे शिक्षणासाठी असून ते उत्तम रित्या पूर्ण केल्यास भविष्यात सर्व गोष्टी मिळवणं शक्य असल्याचं त्यांना समजावून द्या. यामुळे मुलं तुमच्याकडे एखाद्या वस्तूसाठी हट्ट देखील करणार नाहीत.

३. क्लाससाठी वेळ द्या- कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना प्रत्येक क्लासमध्ये त्याने किंवा तिने मन लावून बसावं अशी समजूत त्यांना द्या. कॉलेजला जाण्याचा मुळ उद्देश शिक्षण आहे हे त्यांना पटवून द्या. अनेतदा मुलं काही इतर मुलांच्या संगतीत क्लास बंक करू शकतात.

मात्र क्लास बंक न करता सर्व क्लासला बसावं. आठवड्यातील एखादा दिवस क्लासनंतर थोडा वेळ मित्र मैत्रिणींसाठी द्यावा. यासाठी पालकांची हरकत नसेल हे त्याना पटवून द्या.

४. योग्य भाषेचा वापर- कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असो वा प्राध्यापक सगळ्यांशी बोलताना आदरपूर्वक भाषेचा वापर करावा. तसचं आपल्या भाषेमुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्यास मुलाला सांगावं.

कुणाशी बोलताना त्यांचा धर्म, कुटुंब, वर्ग तसचं राज्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. काही उदाहरणांचे दाखले देऊन तुम्ही मुलांना ही गोष्ट पटवून देऊ शकता.

५. मित्रांसोबत चांगला व्यवहार ठेवा- कॉलेजमध्ये गेल्यावर अनेक नवे मित्र मैत्रिणी आणि ओळखी होतात. यावेळी कुणाशी जास्त मैत्री ठेवावी हे ठरवणं गरजेचं असल्याचं मुलांना सांगा. जी मुलं कॉलेज सोडून इतर बाहेरच्या गोष्टींमध्ये जास्त रस घेत असतील अशांशी दूर राहणं उत्तम हे मुलांना पटवून द्या.

शिक्षणासाठी कायम नवं काही शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांशी मैत्री ठेवावी हे त्यांना समजावून सांगा.

अशा प्रकारे कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच मुलांना त्यांचं ध्येय काय आहे. तसचं महाविद्यालयीन जीवनात आभ्यासला महत्वाचं स्थान असून इतर गोष्टींसाठी योग्य वेळ कोणती हे त्यांना समजावून सांगणं अधिक गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com