‘असामान्य’ पालकत्व

सतत मुलांच्या मागे लागणारे, त्यांना कठोर शिस्तीने दिनचर्या पाळण्यास भाग पाडणारे पालक त्यांच्या मुलांचे संगोपन उत्तम रीतीने करण्यात व मुलांची जडण-घडण करण्यात खूप यशस्वी झाले आहेत, असं एकही उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर नाही.
parenting tips that should every parent should know to bright future of child
parenting tips that should every parent should know to bright future of childsakal
Updated on

प्रांजल गुंदेशा

सतत मुलांच्या मागे लागणारे, त्यांना कठोर शिस्तीने दिनचर्या पाळण्यास भाग पाडणारे पालक त्यांच्या मुलांचे संगोपन उत्तम रीतीने करण्यात व मुलांची जडण-घडण करण्यात खूप यशस्वी झाले आहेत, असं एकही उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर नाही.

गेल्या पंधरा वर्षांत हजारो पालक आणि मुलांसोबत काम करताना, शेकडो शोधनिबंध वाचताना मी काही विशिष्ट नमुने आणि त्यांच्या काही असामान्य सवयी पाहिल्या आहेत. मी या लेखमालिकेतून सर्व जिज्ञासू आणि उत्साही पालकांसाठी या असामान्य, वेगळ्या सवयींचा आढावा घेणार आहे. पाहूया अशाच काही सवयी -

मुलांच्या वेळेला तुमच्या वेळेइतकेच महत्त्व द्या

व्यावसायिक किंवा उद्योजक म्हणून आपण आपल्या वेळेला पैशाइतकेच महत्त्व देतो. मात्र, जेव्हा आपल्या मुलांचा वेळही मौल्यवान आहे असं समजू लागतो, त्याच वेळी आपण त्यांच्याशी जोडले जातो. त्यामुळे आपण वेळेचे योग्य नियोजन करू शकतो. तुम्हाला दुसरं काही तरी काम आहे किंवा कुठे तरी जायचं आहे, म्हणून मुलांना मोबाईल, संगणक बघायलं देणं किंवा केवळ संध्याकाळचा वेळ घालवावा म्हणून त्यांना कुठल्या तरी ‘ॲक्टिव्हिटी क्लास’ला पाठवणं हे योग्य नाही.

महत्त्वाचं : आपण मुलांच्या वेळेला महत्त्व दिलं, तरच ती मोठी झाल्यावर त्यांच्या व इतरांच्या वेळेला महत्त्व देतील.

सवयींना करा आकर्षक

माणूस हा स्वतःच त्याच्या सवयी ठरवत असतो. लहानपणी लागलेल्या सवयी पुढे आयुष्यभर राहतात. त्यामुळे सजग पालक सवयींचं एक आकर्षक ‘मॉडेल’ तयार करतात आणि मुलांना त्यात रस वाटेल याची काळजी घेतात. जर सवयी मजेदार,

मस्त असतील, तर मुले स्वतःहून त्यात सहभागी होतात. एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने एक वर्षभर सकाळी मुलांसोबत खेळ खेळण्याची सवय लावली. याच वेळी तो संगीतही ऐकायचा. हळूहळू ती सवय मुलांच्या अंगवळणी पडली आणि मुले मोठी झाल्यावर ती त्या वेळी अभ्यास करू लागली.

छुपा फायदा : आकर्षक सवयींमुळे मुलांवर न ओरडता, मागे न लागता अपेक्षित परिणाम साधता येतो.

अपयशाचा सामना

बऱ्याच पालकांना पालकत्व खूप तणावपूर्ण वाटते. कारण त्यांना अनेक गोष्टींचे व्यवस्थापन नीट जमत नाही, याहीपेक्षा आपल्या मुलांना अपयश आले तर काय, असा प्रश्‍न त्यांना पडतो. अर्थात, नोकरी शोधण्यासारख्या जीवनातील मोठ्या टप्प्यावर मुलांना अपयश यावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु, वास्तविकतेला सामोरे जाण्याची मानसिकता त्यांच्यात यायला हवी.

उदा. एखाद्या वादविवाद स्पर्धेत, खेळात, वर्गातील छोट्या चाचणीमध्ये, प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी चांगली तयारी केली नाही, तर त्यांना त्या अपयशाचा सामना करता यायला हवा. अपयश निषिद्ध आहे असे त्यांनी म्हणता कामा नये. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलायला हवी.

झिरो ‘स्क्रीन टाइम’

मोबाइलच्या सर्रास वापरामुळे मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. आज ९९ टक्के पालकांच्या समोरची ही समस्या आहे. खरे सत्य हे आहे की, स्क्रीन/मोबाईल/टीव्ही हे केवळ आपल्या मुलांचे बालपण हिरावून घेत नाहीत,

तर त्यांचा मेंदूचा विकास आयुष्यभरासाठी खुंटवत आहेत. एलॉन मस्क आणि बिल गेट्ससारख्या दिग्गजांनीही यावर विचार मांडले आहेत. त्यामुळे वय वर्षे तीनच्या आधी ‘स्क्रीन टाइम’ नाहीच. वय वर्षे ५-६ पर्यंत हळूहळू थोडं फार पाहणं आणि वय वर्षे १३-१५ पर्यंत मुलांना त्यांचा स्वतःचा मोबाईल देणं योग्य ठरतं.

कामातील सहभाग

टाटा उद्योग हे पिढ्यान्‌् पिढ्या विश्वासाशी का जोडले गेले? याचे कारण त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने पाळलेली मूल्ये, व्यावसायिक तत्त्वे आणि केलेला अभ्यास. सुजाण पालक कधीही त्यांच्या मुलांना अक्षम मुलांप्रमाणे वागवत नाहीत, उलट ते त्यांना समजून घेण्यास मदत करतात व अधिक सक्षम करतात.

त्यांच्याशी बोलतात, त्यांना आपल्या कामात सहभागी करू घेतात. कामासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे निरीक्षण करू देतात. मुले मोठे झाल्यावर त्यांच्या कल्पना मांडतात, अभिप्राय विचारतात. त्या वेळी पालक त्यांना समजावून सांगतात. यामुळे आपोआपच मुलांचा मेंदू त्या कामासाठी तयार होऊ लागतो.

तुमच्या पालकत्वामध्ये अशा काही सवयींची भर घालून ते अधिक सक्षम करावे असं तुम्हाला वाटत असेल, तर या सवयींबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम चॅनेलला आणि TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.