esakal | शिक्षणासोबत करा पार्ट टाइम जॉब; विद्यार्थ्यांपुढे आहेत 'हे' पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

job vacancies

आता शिक्षणासोबत करा पार्ट टाइम जॉब!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वाढत्या महागाईच्या काळात शिक्षणदेखील महाग झालं आहे. त्यामुळे नर्सरी असो किंवा महाविद्यालय कुठेही प्रवेश घेताना आपल्याला भली मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे सध्याच्या काळात शिक्षणदेखील महाग झालंय असं दिसून येतं. त्यामुळेच अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम जॉबदेखील करतात. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी घरापासून लांब असल्यामुळे नोकरी करतात. मात्र, शिक्षण, स्वखर्च या सगळ्यांची सांगड घालत असताना अनेकांची तारांबळ उडते. त्यामुळेच शिक्षणासोबतच विद्यार्थी कोणत्या प्रकारचे जॉब करु शकतात ते पाहुयात. (part-time-jobs-reasons-during-studies-know-how-to-get-benefits-ssj93)

शिक्षणासोबतच नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. यात साईज जॉब, पार्ट टाइम जॉब, व्हेकेशन जॉब, विकेंड जॉब, इव्हिनिंग जॉब असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यामुळे पैकी जे शक्य होईल त्या पद्धतीने विद्यार्थी जॉब करु शकतात.त्यामुळे शिक्षणासोबतच मुलांचा आर्थिक प्रश्नही सुटू शकतो. म्हणूनच, या जॉब्सचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.

१. साइड जॉब -

अनेक विद्यार्थ्यांची पसंती असलेला जॉब म्हणजे साइड जॉब. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार फ्लॅक्सिबल वेळ ठेवत असतात. त्यामुळे या काळात विद्यार्थी त्यांचा अभ्यास सांभाळून नोकरी करु शकतात. साधारणपणे कॅटरिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये साइड जॉब्स करण्याच्या अनेक संधी आहेत.

२. विकेंड जॉब -

सध्या अनेक क्षेत्रांमध्ये विकेंड जॉबचा पर्याय सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी हा जॉब करु शकतात. परंतु, यातून मिळणारं आर्थिक वेतन कमी असतं.

३. हॉलिडे जॉब -

कॉलेजला सुट्टी लागल्यावर अनेक तरुण-तरुणी हॉलिडे जॉब करतात. साधारणपणे कॉलेजला २ महिन्यांची सुट्टी असते. त्यामुळे या २ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही नोकरी करु शकता. त्यामुळे तुम्हाला कमी वयात नोकरी करण्याचा अनुभवदेखील घेता येतो आणि दोन महिन्यात सेव्हिंगदेखील करता येते.

पार्ट टाइम जॉब करताना घ्या 'ही' काळजी

१. खर्चावर नियंत्रण ठेवा -

आपण दररोज अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करत असतो. त्यामुळे आपल्या खर्चावर लक्ष ठेवा ज्यामुळे वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. साधारणपणे महिन्याला २-३ हजारांची जरी सेव्हिंग झाली तरी ती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.

२. संपर्क वाढवा -

नोकरी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विविध क्षेत्रांमधील तुमचे कॉटॅक्ट्स वाढतात. त्यामुळे शक्य होईल तितके संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करा. या संपर्कांचा फायदा अनेकदा तुम्हाला शिक्षणासाठीदेखील करता येऊ शकतो.

loading image