

Perplexity AI delivers AI search engine results with cited sources, making research, education, and professional information discovery faster and more reliable.
Sakal
सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
‘गुगलवर शोधा’ हे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. एखादी माहिती हवी असेल, प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल किंवा नवीन विषय शिकायचा असल्यास आपण सर्वप्रथम गुगलची मदत घेतो. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माहिती शोधण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. यासाठी जगभरात चर्चेत असलेले एक नाव म्हणजे ‘परप्लेक्सिटी-एआय’ (Perplexity AI). माहिती शोधणे, तिचे विश्लेषण करणे आणि विश्वासार्ह स्रोतांसह उत्तर देणे या बाबतीत ‘परप्लेक्सिटी-एआय’ने वेगळा मार्ग स्वीकारला आहे.