एका फोटोमध्ये हजार शब्दांची ताकद; जर्नालिस्ट म्हणून घडवा करिअर

एका फोटोमध्ये हजार शब्दांची ताकद; जर्नालिस्ट म्हणून घडवा करिअर

नागपूर : फोटो म्हणजे काय हे आज कोणालाही सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे फोटो सहज काढला जातो. आता तर सेल्फीचे फॅड आले आहे. यामुळे फोटो काढण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पूर्वी फोटो काढण्यासाठी फोटोग्रार्फसची गरज भासायची. आता मात्र तसे काही राहिलेले नाही. अनेकजण स्वतःच फोटो काढतात. तेही चांगल्या प्रकारे...

एका फोटोमध्ये हजार शब्दांची ताकद असते असे म्हणतात. फोटो खूप काही सांगून जातो. वृत्तपत्र वाचताना सर्वांत अगोदर आपली नजर सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या फोटोवर जाते. फोटोतून आपल्या भावना व्यक्त करता येतात. काही जणांना फोटो कसा काढावा याची जाण असते. तसेच ते प्रयत्नातून चांगले फोटोही काढतात. अशा व्यक्तींसाठी फोटो जर्नालिझम हा करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

एका फोटोमध्ये हजार शब्दांची ताकद; जर्नालिस्ट म्हणून घडवा करिअर
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

वृत्तपत्र क्षेत्रात बातम्यांसोबत फोटोला मोठे महत्त्व आहे. फोटोशिवाय बातमीही चांगली दिसत नाही. त्यातही ऑफबिट फोटो म्हटले तर एकदमच चांगले. ते पानावर उठून दिसतात. वृत्तपत्रात ऑफबिट फोटोला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक पानावर त्यासाठी जागा असते. फोटोच्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, विदेशातही जाण्याची संधी मिळू शकते. चला तर जाणून घेऊया या क्षेत्रातील संधीबाबत...

कौशल्य असायला हवे

फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करण्यासाठी तुमच्याकडे चांगले कौशल्य असायला हवे. सध्या या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. तुम्ही काढलेला फोटो काय सांगत आहे हे कौशल्याने मांडावे लागते. त्यामुळे नुसतं फोटो काढून चालत नाही तर कॅप्शनही द्यावा लागते. तुम्हाला चांगला फोटो काढता येत असेल तर तुम्ही वर्तमानपत्रात काम करू शकता. सुरुवातीला वरिष्ठ फोटोग्राफरच्या मार्गदर्शनात काम करता येईल.

एका फोटोमध्ये हजार शब्दांची ताकद; जर्नालिस्ट म्हणून घडवा करिअर
अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग

स्वत:ची वेबसाइट तयार करा

या क्षेत्रात खूप मेहनत करावी लागते. बाहेर फिरावे लागते. त्यामुळे याची तयारी ठेवा. दृष्टिकोन विकसित करा. कौशल्याने फोटो काढा. स्वत:ची वेबसाइट तयार करा. साइटवर फोटो पोस्ट करत राहा. तुमचे फोटो सोशल साइटवरही अपलोड करता येतील. फोटो स्टोरी तयार करा. शब्दांशी खेळा. लेखन कौशल्य वाढवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com