life chess
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आयुष्य ‘टी-२०’ नसून कसोटी क्रिकेटसारखे आहे. खेळपट्टीवर तग धरून राहायचे असल्यास एकाग्रता, धीर, क्षमता यांची सांगड घालून खेळावे लागते. आपण काळ-वेळेप्रमाणे आपले राहणीमान, कामाची गती आणि व्यग्रता नियंत्रणात आणल्यास जीवन उत्तमोत्तम होऊ शकते.
लांब जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवणे आणि आपला वेग विशिष्ट गतीवर राखणे जेणे करून आपली क्षमता शेवटपर्यंत पुरेल याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे.