esakal | 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो
sakal

बोलून बातमी शोधा

'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थनं संपूर्ण जगाचा निरोप घेतला असून या वृत्तानंतर चित्रपटश्रृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

sakal_logo
By
स्नेहल कदम

टीव्ही आणि मालिका जगतातील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (sidharth shukla) आज निधन झालं. सिद्धार्थच्या अकाली जाण्याने मनोरंजनविश्वाला धक्का बसला आहे. बिग बॉससह वेगवेगळ्या रिअॅलिटी शो आणि मालिकांमध्ये त्याने काम केलं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थनं संपूर्ण जगाचा निरोप घेतला आहे. या वृत्तानंतर चित्रपटश्रृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

'बिग बॉस 13' व्या सिझनला सिद्धार्थने भाग घेतला होता आणि या सिझनचा तो विजेताही ठरला होता. यादरम्यान अभिनेत्री व गायिका शहनाज गिलसोबत (Shehnaaz Gill) त्याची चांगली मैत्री झाली होती. सिझनमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. दरम्यान या दोघांचा एक म्युझिक व्हिडीओही प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी समजल्यानंतर शहनाज गिलने सुरू असलेलं शूटिंग सोडलं आहे.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

यादरम्यान सिद्धार्थने केलेली अखेरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 24 ऑगस्ट रोजी अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट करुन त्याने फ्रंटलाइन वर्कर्सला धन्यवाद म्हटलं होतं. #MumbaiDiariesOnPrime आणि #TheHeroesWeOwe असे हॅशटॅग वापरत सिद्धार्थने पोस्ट केली होती. या पोस्टामध्ये सर्व फ्रंटलाइन वर्कर्सच्या कामाचं कौतुक केलं होतं. दरम्यान सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट सहाजणांना फॉलो केलं आहे. यामध्ये एकता कपूर आणि शहनाज गिलसह आणखी चार जणांचा समावेश आहे.

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या सिद्धार्थने मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'बाबुल का आंगन छुटे ना', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सिद्धार्थचा 'प्रवास'

loading image
go to top