

Maharashtra Police announces mega recruitment for 15631 constable posts starting applications from 29 October 2025
esakal
Police Bharati 2025 Application Process : महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या स्वप्नांना पंख मिळणार आहेत. राज्य गृह विभागाने अखेर १५,६३१ पोलीस शिपायांच्या मेगा भरती प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे. पोलीस शिपाई, चालक शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅण्डसमन अशा विविध पदांसाठी ही भरती असून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत.