esakal | पोलिस भरती लेखी परीक्षा सुरळीत सुरू; कडक बंदोबस्त |Police Recruitment 2021
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरती

पोलिस भरती लेखी परीक्षा सुरळीत सुरू; कडक बंदोबस्त

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : पुणे पोलिस आयुक्तलयाअंतर्गत होणाऱ्या पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी मंगळवारी बहुतांश उमेदवारानी सकाळी 10 वाजण्यापूर्वीच हजेरी लावली. केंद्रवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या नियमांचे पालन करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी केंद्रवर हजर होते.

शहरातील 79 केंद्रावर लेखी परीक्षा होत असून त्यासाठी 39 हजार 323 अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून सोमवारी रात्रीपर्यंत परिक्षेची पुर्ण तयारी करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रवर पोलिस बंदोबस्त, व्हिडीओ चित्रीकरण व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

हेही वाचा: पिंपरी: शाळा सॅनिटायझेशनचा खर्च कोण करणार?

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लेखी परिक्षेसाठी उमेदवार सोमवारी रात्रीच शहरात दाखल झाले होते. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या ठिकाणी रात्री मुक्काम करुन उमेदवारांनी सकाळी लवकरच परीक्षा केंद्र शोधण्यास सुरुवात केली. केंद्रच्या परिसरातच नाष्टा केल्यानंतर उमेदवारानी 9.30 वाजल्यापासून केंद्रवर हजेरी लावण्यास सुरुवात झाली. केंद्रच्या ठिकाणी उमेदवारची पोलिस कर्मचारी यांच्यकडुन व्यवस्थित तपासणी करुन हातावर सैनिटायझर देऊन बैठकीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. एका बेंचवर एक उमेदवार अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी परीक्षा केंद्रवर उपस्थिती लावली होती. केंद्रची पाहणी केल्यानंतर उमेदवाराना प्रवेश देण्यात आला. सकाळी 10.30 वाजेपर्यंत बहुतांश उमेदवार परीक्षा केंद्रवर हजर झाले होते.

loading image
go to top