esakal | Polytechnic : ऑपशन फॉर्म भरण्यासाठी तब्बल 44 हजार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

polytechnic college

Polytechnic : ऑपशन फॉर्म भरण्यासाठी तब्बल 44 हजार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पॉलीटेक्निक (polytechnic) या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश (Degree Admission) प्रक्रियेत प्रथम फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने (online) ऑपशन फॉर्म भरण्यासाठी मागील दोन दिवसात तब्बल 44 हजार विद्यार्थ्यांनी आपला प्रतिसाद (Students response) नोंदवला आहे. ही प्रक्रिया 16 सप्टेंबर पर्यंत चालणार असल्याने यासाठी विद्यार्थ्यांनी आपला ऑपशन फॉर्म (option form) विहित मुदतीत निश्चित करावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ (dr abhay wagh) यांनी केले आहे.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिये अंतर्गत प्रथम फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने ऑपशन फॉर्म भरण्याची व निश्चिती कारण्याची प्रक्रिया 13 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी आत्तापर्यंत यासाठी 44 हजार विद्यार्थ्यांनी आपलेऑपशन फॉर्म भरले असल्याची माहिती डॉ. अभय वाघ यांनी दिली. राज्यात पॉलीटेक्निकची एकूण 365 महाविद्यालये असून त्यात एकूण 1 लाख 9 हजार 724 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दरम्यान, बारावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिये अंतर्गत प्रथम फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची मुदत काल संपली आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचा मागील वर्षाप्रमाणे ह्यावर्षीही औषधनिर्माण पदविका (डी. फार्मसी) प्रवेशासाठी प्रचंड ओढा असून य वर्षी उपलब्ध जागांच्या तुलनेत डी . फार्मसी साठी अंदाजे तीन पट अर्ज आल्याचे सांगण्यात आले

loading image
go to top