पट्टीने रेषा आखताना टोकदार पेन व बेंचवर खरके असल्यामुळे काही उत्तरपत्रिका (Answer Sheet) फाटल्या. अशावेळी बदलून उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला.
कुडित्रे : करवीर तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रांवर (Examination Centre Karveer) विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा (12th Exam) दिली. जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान हाती घेतले. दरम्यान, पारदर्शक पॅड वापरण्याच्या सूचना अचानक दिल्यामुळे काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्यात गोंधळ उडाला. उत्तरपत्रिका वाटताना लाकडी पॅड काढून घेतल्यामुळे बेंचवर उत्तरपत्रिका सोडवावी लागली.