येवला : दहावी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी ग्रामीण टपाल विभागात शाखा पोस्टमास्तर (बीपीएम) आणि सहायक शाखा पोस्टमास्तर (एबीपीएम) या पदांसाठी मालेगाव सर्कलमध्ये ५७ व नाशिक सर्कलमध्ये ३५ जागा भरल्या जातील..विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, दहावीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीतून उमेदवारांची निवड होणार असल्याने गावातच पोस्टमन (Post Office Recruitment) होण्याची संधी युवकांना चालून आली आहे. ही भरती संगणकीकृत गुणवत्ता यादीद्वारे होणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मुलाखत किंवा स्वतंत्र स्पर्धा परीक्षेची गरज नाही. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी टपाल खात्याच्या अधिकृत अधिसूचनेचा काळजीपूर्वक अभ्यास करावा..Mumbai DahiHandi: मुंबईत ७ वर्षीय चिमुकल्यासह ३४ वर्षांच्या तरुणाचा दहीहंडीवेळी मृत्यू; २३६ गोविंदा जखमी.पदनिहाय पात्रता, विभागनिहाय रिक्त जागा, अर्ज शुल्क, कागदपत्रे तसेच अंतिम तारीख याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे. टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन मुदतीपूर्वी भरावे..ठाण्यात हिट अँड रनचा थरार! चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, ३-४ वाहनांना उडवत पादचारी महिलेला चिरडलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी.'अशी' असेल भरतीऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख: १९ सप्टेंबर, अर्ज सादर करण्याचीअंतिम तारीख : २१ सप्टेंबरअर्ज दुरुस्ती: २३ ते २४ सप्टेंबर..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.