न्यू नॉर्मल : समुद्री व्यवसायाला बळकटी देणारी बंदरे

कृष्णापट्टणम बंदराजवळ आंध्र प्रदेशचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. यासाठी लागणारा कोळसा बंदरावर येतो, कन्वेअर बेल्टने आंध्र वीजनिर्मिती प्रकल्पात पोहोचवला जातो.
Port
PortSakal
Summary

कृष्णापट्टणम बंदराजवळ आंध्र प्रदेशचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. यासाठी लागणारा कोळसा बंदरावर येतो, कन्वेअर बेल्टने आंध्र वीजनिर्मिती प्रकल्पात पोहोचवला जातो.

बहुतांश बंदरांना आता एसी झेड विकसित केला आहे. याअंतर्गत उद्योगांना सवलती देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने लागणारी सुविधा वीज, रस्ते, रेल्वे, रोड, हे सर्व बंदराचा विकासाचा भाग आहे. राज्य सरकारे वीज निर्मिती, जल शुद्धीकरण किंवा महा गोदाम यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्रात राबवताना दिसतात.

कृष्णापट्टणम बंदराजवळ आंध्र प्रदेशचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. यासाठी लागणारा कोळसा बंदरावर येतो, कन्वेअर बेल्टने आंध्र वीजनिर्मिती प्रकल्पात पोहोचवला जातो. यामुळे वेळ, पैसा वाचला. प्रदूषण कमी झाले. वीज निर्मितीचा सरासरी खर्च कमी झाला. पर्यायाने एकूण उत्पादन खर्च कमी झाला आहे. या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये पॅकिंग, रि-पॅकिंग, त्याची साठवण अशा सेवार्थ अत्यावश्यक आहेत. तिथेच असणारी ट्रक वाहतुकीची ऑफिसेस, बँका, सहकारी संस्था, विमा, आयात- निर्यात सेवाकेंद्र, हे दृश्य आता कोणत्याही बंदराचा भाग झाला आहे. भारतात ज्या ज्या राज्यात प्रमुख सागरी बंदर आहेत त्या त्या राज्यातून तेथील वैशिष्ट्यपूर्ण सामानाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. कोचिन, चेन्नई, मेडिकेरी वरून मसाल्याचे पदार्थ, कॉफी, मुंद्रा पोर्टवरून दाणे, डाळी, कापूस याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. एन्नोर पोर्ट औद्योगिक, औष्णिक, खत प्रकल्पांचे केंद्र बनले आहे. न्यू मेंगलोर पोर्ट पेट्रोलियम उत्पादने, एलपीजी, लाकूड, खते, इतर रसायने आयात करते. बंदरांच्या विकास आराखड्यात आता कौशल्य विकास केंद्र सुरू केली जात आहेत. अनेक ठिकाणी ट्रक चालक, फोर्कलिफ्ट, क्रेन, सिमेंट मिक्सर ऑपरेटर, सुरक्षा, देखभाल कर्मचारी, मशिन रिपेअरिंग असे कोर्सेस आहेत.

बंदराचा विकास म्हणजे अवतीभवतीच्या समाजाचा विकास. बंदरांची बांधणी करताना झालेल्या विस्थापितांची काळजी बंदरातील उद्योजकांनी घेतली आहे. त्यांच्यासाठी रोजगार, जागा, त्यांच्या मुलांचे शिक्षणासाठीची सोय हे लाभ मिळाले आहेत. नेल्लोर, नागोरे गावांची प्रगती कृष्णापट्टण पोर्टचे प्रतीक आहे. गुजरातमध्ये बंदराजवळ मासेमारी व्यवसायाला मिळालेली चालना हे याचेच उदाहरण आहे.

२०२०-२१ मध्ये भारताने सुमारे ६ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचे साडे अकरा लाख मेट्रिक टन सीफूड निर्यात केले होते. यात गोठवलेली कोळंबी हे प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. फिशरी आणि ॲनिमल हजबंडरी असे नवे मंत्रालय ही केंद्र सरकारने सुरू केले आहे. या विकासाबरोबर भारताच्या किनाऱ्या लगतचा पर्यटन विकास देखील बहरत आहे. मुंबई ते गोवा सुरू झालेला नवा क्रूज आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. हे भारतातील पहिले लक्झरी क्रूझ ‘अंग्रिया’ जपानमध्ये बनवलेले १३१ मीटर लांब आणि सात डेक असलेले अवाढव्य समुद्री जहाज. किनाऱ्यावरची दीव, दमण किंवा सोमनाथ, केरळची अंतर्गत आलापी यासारखे किनारे नव्या भारताची कथा सांगत आहेत. समुद्री व्यवसायाला बळकटी देणारी बंदरे आणि सरकारची आश्वासक वाटचाल, यातल्या व्यवसाय संधी पुढील लेखात पाहूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com