इन्स्पायर ॲवॉर्ड मानक : विज्ञानातील नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना देत १० लाख बालमनांना प्रज्ञाविकासाचा राजमार्ग

इन्स्पायर अवॉर्ड-मानक योजनेतून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विज्ञानकल्पनांना चालना; शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत मार्गदर्शित प्रवासातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण
INSPIRE Awards encourage school students to turn innovative ideas into solutions for real-life problems.

INSPIRE Awards encourage school students to turn innovative ideas into solutions for real-life problems.

Sakal

Updated on

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

राष्ट्राच्या विकासासाठी आणि मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विज्ञानाचा विकास महत्त्वाचा असतो. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे तसेच त्यांच्यात विज्ञानाची व्यापक समज विकसित करणे यासाठी एक सहयोगी, सर्जनशील आणि आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. विज्ञान क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे ज्ञानात भर घालणाऱ्या १० लाख बालमनांच्या विचारांना प्रोत्साहन देणे, या संकल्पनेवर आधारित इन्स्पायर ॲवॉर्ड-मानक ही वैशिष्टपूर्ण योजना आहे. भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठान (एनआयएफ) यांच्याद्वारे राबवण्यात येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com