संवाद : नोकरी करावी की व्यवसाय?

काही लोक करिअरची सुरुवात नोकरीपासून करतात आणि नंतर व्यवसायाकडे वळतात. तर काही करिअरची सुरुवात व्यवसायाने करतात आणि नंतर नोकरीकडे वळतात.
Jobs
JobsSakal
Updated on
Summary

काही लोक करिअरची सुरुवात नोकरीपासून करतात आणि नंतर व्यवसायाकडे वळतात. तर काही करिअरची सुरुवात व्यवसायाने करतात आणि नंतर नोकरीकडे वळतात.

- प्रणव मंत्री

संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात जास्त विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय करावा?

काही लोक करिअरची सुरुवात नोकरीपासून करतात आणि नंतर व्यवसायाकडे वळतात. तर काही करिअरची सुरुवात व्यवसायाने करतात आणि नंतर नोकरीकडे वळतात. काही लोक एकाच वेळी नोकरी आणि व्यवसाय दोन्हीही सांभाळतात. नोकरी चांगली की व्यवसाय चांगला यावरून नेहमीच वाद होत आला आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे नोकरी आणि व्यवसाय या दोघांचेही आपापले फायदे आणि तोटे आहेत. चला तर मग नोकरी आणि व्यवसायाचे

फायदे-तोटे जाणून घेऊया :

नोकरी करण्याचे फायदे :

  • पगार नियमितपणे बँक खात्यात जमा होतो.

  • ऑफिसच्या वेळेपुरतेच काम करावे लागते. घरून (work from home) काम देण्यात आले असेल, तर काही वेळा तुम्हाला अतिरिक्त काम येऊ शकते.

  • रजा, सुट्ट्या आनंदात घालवायला मिळतात.

  • नफा-तोट्याशी सामना करावा लागत नाही.

  • कर्मचारी या नात्याने वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांची माहिती मिळते.

  • कंपनीकडून अनेक फायदे मिळतात.

  • अशी विविध पदे आहेत जिथे कर्मचारी घरून किंवा इतर कोणत्याही जवळच्या ठिकाणी काम करू शकतो जे पुरेसे आहे. हे एक लवचिक दृष्टिकोन बनवते.

नोकरी करण्याचे तोटे :

  • नोकरीत तुम्ही बॉससाठी काम करता.

  • वेळा राजकारणाला सामोरे जावे लागते. काही वेळा सह-कर्मचारी काम करू शकत नसतील आणि योग्यता दाखवू शकत नसल्यास खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.

  • नोकरीवरून काढून टाकण्याची भीती असते.

  • पगाराच्या स्वत-च्या मर्यादा आहेत. पैशांची वाढ अत्यल्प असते.

  • अनेकदा बॉस विनाकारण फटकारतो.

  • मित्रांना वेळ देणे कमी होऊ लागते.

  • दिवसभर कामकाजाचा तणाव असतो.

  • सुट्टीसाठी तुम्हाला अधिकाऱ्यांची मंजुरी घेणे आवश्यक असते.

उद्योग करण्याचे फायदे :

  • वेळेचे बंधन नसते.

  • स्वत-च स्वत-चे मालक असतो.

  • तुम्हाला चांगले साध्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी प्रेरक शक्ती म्हणजे समाधान. तुम्हाला नेहमी जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता तेव्हा तुम्हाला समाधान वाटते.

  • तुमची मेहनत तुम्हाला मोबदला देते.

  • मोठ्या गरजा भागवता येतात.

  • कधीही कामापासून सुट्टी घेता येते.

  • तुम्ही तुमच्या कामाचे बॉस असल्याने तुम्हाला प्रतिष्ठित वाटते.

  • मोठ्या व्यक्तींसोबत ओळखी वाढतात.

  • गरजा पूर्ण करूनही पैसे वाचवता येतात.

उद्योग करण्याचे तोटे :

  • नुकसान होण्याचा धोका आहे.

  • स्पर्धेचा सामना करावा लागतो.

  • उत्पन्नात चढ उतार होत असतो.

  • भरपूर पैशांची गुंतवणूक करावी लागते.

  • कामाची कोणतीही निश्चित वेळ नाही.

  • बाह्य दायित्वांचा ताण येऊ शकतो

आता नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही प्रकारांबद्दल तुमच्याकडे थोडीशी अंतर्दृष्टी आहे, तुम्हाला काय योग्य आहे हे तुम्ही काळजीपूर्वक ठरवले पाहिजे. नोकरी करावी की व्यवसाय/उद्योग करावा हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com