परदेशी शिकताना : शैक्षणिक लिखाणातील कौशल्य

आपण सगळ्यांनी मागच्या भागात परदेशी शिक्षणासाठी आवश्यक घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात आपण शैक्षणिक लेखन म्हणजेच ॲकॅडेमिक रायटिंग याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
Education Writing Skill
Education Writing SkillSakal
Updated on
Summary

आपण सगळ्यांनी मागच्या भागात परदेशी शिक्षणासाठी आवश्यक घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात आपण शैक्षणिक लेखन म्हणजेच ॲकॅडेमिक रायटिंग याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

- ॲड. प्रवीण निकम

आपण सगळ्यांनी मागच्या भागात परदेशी शिक्षणासाठी आवश्यक घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात आपण शैक्षणिक लेखन म्हणजेच ॲकॅडेमिक रायटिंग याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

शैक्षणिक लिखाण म्हणजेच ॲकॅडेमिक रायटिंग हे एक प्रकारचे संप्रेषण साधन आहे, जे विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयामध्ये प्राप्त केलेले ज्ञान मोजक्या आणि अचूक शब्दात मांडण्यासाठी साहाय्य करते. यामुळे शैक्षणिक लेखन आणि संशोधन नेहमीच एक विशिष्ट सिद्धांत आणि तथ्ये देऊन युक्तिवादाला स्पर्श करणारा असायला हवा. विद्यापीठातील प्राध्यापक त्यांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी देखील याचा वापर करतात.

विविध प्रकारचे ॲकॅडेमिक संशोधन प्रबंध किंवा रिसर्च पेपर लिहिणे हे विद्यार्थ्यांना खूप क्लिष्ट काम आहे असं वाटतं; पण खरंतर अशा ॲकॅडेमिक रिसर्च पेपरमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. कारण यामध्ये काळजीपूर्वक संशोधनाच्या दीर्घ प्रक्रियेचा समावेश आहे आणि त्यासाठी विशिष्ट कौशल्ये आवश्यक आहेत. बऱ्याचदा, विद्यार्थ्यांना एकतर पुरेसे लेखनकौशल्य नसते किंवा ते प्राध्यापकांच्या काय म्हणतील? या न्यूनगंडात राहून घाबरतात. परंतु शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेपासून ते शिक्षण पूर्ण करेपर्यंत विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये ॲकॅडेमिक रायटिंग किंवा रिसर्च पेपर लिहिणे टाळू शकत नाहीत, कारण ते प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीचा अविभाज्य घटक आहे.

मी माझ्या अनुभवावरून सांगतो, शैक्षणिक लिखाणामुळे माझी आकलन करण्याची क्षमता, लिखाण करण्याची क्षमता यामध्ये खूप प्रगती झाली. विद्यार्थी म्हणून शैक्षणिक लेखनाचे काही नवीन पैलू परदेशी शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेपासून ते शिक्षण करेपर्यंत शिकण्याची संधी मिळाली. मला लक्षात आलेले काही पैलू म्हणजे-

१) शैक्षणिक लिखाण आपले क्रिटिकल थिंकिंग स्किल्स सुधारते : शैक्षणिक लिखाण करत असताना आपण फक्त माहिती सादर करण्यापुरते मर्यादित नसतो, तर या प्रक्रियेमध्ये आपण काळजीपूर्वक संशोधन करतो आणि माहितीचे मूल्यांकन करतो. अशी प्रक्रिया बौद्धिकक्षमता वाढविण्यास मदत करते आणि आपल्याला विविध मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करण्यास सक्षम करते.

२) शैक्षणिक लिखाण आपले ज्ञान वाढवते : शैक्षणिक लिखाण करताना आपल्याला बऱ्याचदा विविध पुस्तकं, रिसर्च आर्टिकल्स यांना रेफर करावं लागतं आणि यामुळे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि विविध विषयांवर चर्चा करण्याची क्ष्षमता वाढते. प्रत्येक वेळी एखादा विद्यार्थी निबंध लिहितो तेव्हा तो काहीतरी नवीन तपासतो, अशा प्रकारे विशिष्ट युक्तिवादांवर भिन्न दृष्टिकोन ठेवण्यास शिकतो. त्यामुळे असे म्हणता येईल, की शैक्षणिक लेखन तुम्हाला नावीन्यपूर्ण आणि विचारमंथन करण्याची संधी नक्कीच देते जे तुम्हाला पूर्वी सुचू शकले नव्हते.

३) शैक्षणिक लेखन तुमची निरीक्षण आणि विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारण्यास मदत करते आणि तुमची स्मरणशक्ती वाढवते.

आणि म्हणूनच आपण आपले लेखनकौशल्य सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. कदाचित, तुम्हाला समजले असेल, की उच्च शिक्षणामध्ये अगदी प्रवेशप्रक्रियेपासून शैक्षणिक लेखनाचे महत्त्व खूप आहे, आपण जर परदेशी शिक्षण घेण्याचा विचार करित असाल तर शैक्षणिक लेखनाला कमी महत्त्व देता येणे शक्यच नाही.

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com