परदेशी शिकताना : ‘स्टेम’ क्षेत्रातील मुलींचे शिक्षण आणि प्रतिनिधित्व!

सध्याच्या आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. असे असले‌ तरी, जगभरात स्टेम विषयांच्या व्यावसायिक क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी आहे.
Girls in Stem Field Education
Girls in Stem Field EducationSakal

- ॲड. प्रवीण निकम

सध्याच्या आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. असे असले‌ तरी, जगभरात स्टेम विषयांच्या व्यावसायिक क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी आहे. पूर्वीच्या काळचा विचार केला असता, विशिष्ट चौकटीत साचेबंद स्वरूपात मुली करिअर क्षेत्राची निवड करायच्या; परंतु स्टेम क्षेत्राची प्रगती आज उत्तरोत्तर वाढत आहे. तरी देखील यात मुलींची संख्या अजूनही कमी प्रमाणात आहे.

आता स्टेम (STEM) म्हणजे तरी काय तर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्रातील शैक्षणिकदृष्ट्या सहभाग. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध संस्था, फाऊंडेशन आणि कंपन्यांकडून अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अर्जदारांना त्यांची आर्थिक गरज, शैक्षणिक पात्रता, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरीच्या आधारावर या शिष्यवृत्ती मिळतात.

काही शिष्यवृत्तीसाठी तुम्ही पेपर, निबंध लिहिणे आवश्यक आहे, तर काहींना मुलाखतीद्वारे शैक्षणिक व सामाजिक कामांविषयी विचारले जाते. याविषयी पुढील लेखात समजून घेणार आहोतच. तत्पूर्वी, परदेशातील स्टेम (STEM) अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्याचे फायदे करिअरदृष्ट्या जाणून घेऊयात.

स्टेम अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार करायला लागतो. त्यामुळे, साहजिकच अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार आणि समस्या सोडवण्याच्या आंतरशाखीय दृष्टिकोनाच्या विकासाला प्रोत्साहन मिळते. यासर्व गोष्टी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

या क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक असले, तरी मुलींनादेखील इथला अभ्यासक्रम आणि संधी समजून घेणे आवश्यक आहे. असंख्य महाविद्यालये आणि संस्था स्टेम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी लवचिकदृष्ट्या अभ्यासक्रम तयार करते.

परदेशात हे प्रमाण अधिक आढळून येते. परदेशात ‘स्टेम’चा अभ्यास करण्याचे मुख्य कारण म्हणजे ते ऑफर करत असलेल्या अभ्यासोत्तर कामाच्या संधींची संख्या जास्त आहेत.

यासाठी विद्यार्थ्यांस कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या पद्धतीने पुढे जायचे आहे, हे ठरवणे ही पहिली पायरी असते. इतकेच नाही, तर जे विद्यार्थी संशोधन आणि त्या आधारित विकासाच्या, प्रयोगाभिमुख क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेऊ इच्छितात. अशांसाठी जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांद्वारे अभ्यास पूर्ण करण्याची संधी उपलब्ध असते.

यात, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असताना संशोधन सहायक म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. तुमचा जसजसा ‘स्टेम’ क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्णत्वाकडे जातो, तसतसे शिकवण्याची पद्धत आणि शिकण्याच्या पद्धतीमध्येही बदल होतो. एखाद्या थिअरीकडून मूळ सरावाकडे हा बदल होतो. बहुतेक स्टेममधील कोर्सेस अशाच प्रकारे डिझाइन केलेले आहेत.

कोर्सच्या शेवटच्या सत्रात किंवा कालावधीत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन कार्य पूर्ण करावे लागते.‌ साहजिकच, यामुळे मुलींच्या या क्षेत्रातील सहभागाचा विचार करता त्यांचे व्यावहारिक ज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होऊ शकतात.

यू.एस, यू.के आणि कॅनडासारख्या देशांतील विद्यार्थ्यांसाठी ‘स्टेम’ अभ्यासक्रमांत व्यावहारिक प्रशिक्षण कालावधी किमान एक वर्षाचा आहे. तर, इतर अभ्यासक्रमात सुमारे सहा-आठ महिन्यांचा व्यावहारिक अनुभव घेता येतो. थोडक्यात, स्टेम क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. फक्त संधीच नाही, तर शिष्यवृत्तीदेखील आहेत. त्यामुळे, आपल्या करिअरच्या वाटा निवडताना या क्षेत्रात जास्तीत जास्त मुलींना सहभाग वाढणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com