अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून पसंतीक्रम भरता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online-Admission
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून पसंतीक्रम भरता येणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून पसंतीक्रम भरता येणार

मुंबई - सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या दहावी परीक्षेच्या निकालामुळे रखडलेली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, २२ जुलैपासून सुरू होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भाग दोनसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी १० पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.

मुंबईसह राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या पाच महापालिका क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. यासाठी साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या भागासाठी नोंदणी केली आहे. त्यात मुंबईत २ लाख ९१ हजार १९१, तर पुण्यात ९४ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हे विद्यार्थी आता २२ जुलैपासून दुसऱ्या भागासाठी अर्ज करू शकतील.

महाविद्यालयातील कट ऑफ आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विभागाने मागील वर्षाचा कट ऑफ https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जाची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर `नो युअर इलिजिबिलिटी` हा पर्यायही उपलब्ध केला आहे. यामध्ये दहावीतील गुण, आरक्षण, शाखा, माध्यम, पत्ता आदी माहिती भरून कोणत्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र आहे, याची माहिती घेता येणार आहे.

नोंदणी केलेले विद्यार्थी

मुंबई महापालिका क्षेत्र - २,९१,१९१

पुणे, पिंपरी-चिंचवड- ९४,२८७

नागपूर - ३४,३७५

नाशिक - २६,०५४

अमरावती - ११,१८१

Web Title: Preference Order Can Be Filled For Eleventh Online Admission From Today Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..