

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठे (universities), स्वायत्त संस्था, खाजगी विद्यापीठे (private universities) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये (colleges) शिक्षण घेणाऱ्या 18 ते 25 वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची मोहीम (students vaccination drive) सोमवारी, २५ ऑक्टोबरपासून होत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या कोणत्याही महाविद्यालयांमध्ये जाऊन लस घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवास करून आपल्या महाविद्यलायांत जाण्याची गरज नसून त्यासाठी आज उच्च शिक्षण विभागाकडून (Education higher authorities) सूचना देण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राज्यात मिशन युवा स्वास्थ लसीकरण मोहीम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार असून त्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांसोबत आढावा घेण्यात आला. त्यात बहुतांश महाविद्यालयांमध्ये लसीकरणासाठीची तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मुंबईत वांद्रे येथील एनएमके आणि चेतना महाविद्यालयात उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी दिली.
मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ५५ हून अधिक महाविद्यालयांमध्ये अगोदरच लसीकरणासाठी विविध प्रकारच्या मोहीमा सुरू आहेत. काही महाविद्यालयांनी अनेक जणांना लसी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला असून २ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची तयारी केली जात असल्याचेही डॉ. रोडे म्हणाल्या. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील ७० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण यापूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती समोर आली असून उर्वरित १ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे बाकी आहे. त्यातही काहींचे एक डोस पूर्ण झाले असल्याने कमी वेळातच मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये लसीकरणाची मोहीम यशस्वी करतील अशी माहितीही डॉ. रोडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.