

मुंबई : मुंबईतील 500 हुन अधिक उद्यानांचे मूल्यांकन (Garden Evaluation) करण्यात आले आहे. मूल्यांकनात पालिकेची केवळ 18 टक्के उद्याने 'ए' क्षेणीत (A Grade) असल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि 'मिनिस्ट्री ऑफ मुंबई’ज मॅजिक यांनी केलेल्या उद्यानांच्या मूल्यांकनाचा अहवाल (Mumbai Magic Report) पालिकेला सुपूर्त केला आहे.
प्रत्येक उद्यानांना श्रेणींसोबत युनिक कोड्स देण्यात आले आहेत. फेलोशीपने उद्यानांना 3 गुणांनुसार श्रेणीबद्ध केले, जेथे अव्वल उद्यानांना 'ए' श्रेणी देण्यात आली. मूल्यांकन करण्यात आलेल्या 500 उद्यानांपैकी 18 टक्के उद्यानांना 'ए' श्रेणी (अपवादात्मक उत्तम स्थिती) देण्यात आली, तर 70 टक्के उद्यानांना 'बी' श्रेणी (उत्तम स्थिती) आणि 12 टक्के उद्यानांना 'सी' श्रेणी (सुधारणा करण्याची गरज) देण्यात आली. हे संशोधन 'हरिता दि ग्रीन फूटप्रिंट फेलोशिप'चा भाग असून यामुळे सार्वजनिक कृतीला चालना देण्यासाठी आणि मुंबईतील सर्वोत्तम हरित जागांप्रती कार्य करण्यासाठी हा अहवाल बनविण्यात आला. यामुळे करण्यात आलेल्या या 500 उद्यानाच्या सर्वेक्षणामधून मुंबईच्या हरित जागांच्या एकूण स्थितीबाबत सुस्पष्ट व सुलभ माहिती उपलब्ध झाली आहे.
यावेळी नागरिक प्रतिसाद सर्व्हे करून नागरिकांची मते देखील जाणवून घेण्यात आली. त्यानुसार ,उद्यानांमधील प्रकाशयोजना चांगल्या प्रतीची असून उद्यानांची देखरेख ही उत्तमरित्या केली जात असल्याचे नमूद करण्यात आले. तर नागरिकांनी केलेल्या शिफारसींमध्ये उद्यानामध्ये विकलांग व्यक्तींसाठी सुविधा असाव्यात, उद्यानांमध्ये किंवा उद्यानांच्या आसपासच्या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालये असावीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा समावेश आहे.
तीन महिन्यांच्या फेलोशिप कालावधीदरम्यान आर्किटेक्चर, शहरी नियोजन, डिझाइन, सामाजिक कार्य व पर्यावरण रचना अशा विविध पार्श्वभूमींमधील तरूणांनी शहरी सस्टेनेबिलिटी चॅम्पियन्स बनण्यासाठी पुढाकार घेतला. या तरुणांचे कार्य हरित व राहण्यास अनुकूल शहर निर्माण करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.यासाठी व्यापक प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून फेलोजना तंत्रज्ञान डेटाबेस निर्माण करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि डेटा गोळा करण्यासोबत मॅपिंग करण्याच्या प्रक्रियेची माहिती देखील देण्यात आली.
"उद्याने व मनोरंजनपूर्ण मैदांनाच्या या व्यापक सर्वेक्षण आणि ग्रेडिंगचा आम्हाला फायदा होईल. प्रोजेक्ट मुंबईने सबमिट केलेला अहवाल उद्याने व मैदांनाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असून पुढील देखभाल व व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी फायद्याचा ठरेल."
-जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक
"मुंबईच्या हरित जागांप्रती त्यांच्या आवडीमुळेच या उद्यानांचा हा प्रचंड डेटाबेस तयार झाला. हा तांत्रिक अहवाल उद्यान विभागासाठी मुंबईच्या हरित जागांमध्ये नवीन उद्यानांकरिता 'अपग्रेडेशन प्लान' तयार करण्यासाठी उपयोगी ठरेल."
- रूपाली वैद्य, प्रकल्प प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.