Exam News : दहावी-बारावी परीक्षांमध्ये मोठा बदल, दरवर्षी तीन परीक्षा घेण्याचा निर्णय; शिक्षण विभागाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुरवणी परीक्षेत मिळालेले गुण हेच विद्यार्थ्याचे खरे गुण मानले जातात.
Karnataka School Examination Board
Karnataka School Examination Board esakal
Summary

नवीन पॅटर्ननुसार, तिन्ही परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला जाईल.

बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (Karnataka School Examination Board) दरवर्षी तीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. सध्या संभाव्य परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून तीन परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण निवडण्याची संधी देण्यात आली आहे.

सध्या दुसरी बारावी परीक्षा (12th Exam) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलेले गुण नाकारण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, मागील परीक्षेत विद्यार्थ्याला (Student) मिळालेले गुण जास्त असले तरी, पुरवणी परीक्षेत मिळालेले गुण हेच विद्यार्थ्याचे खरे गुण मानले जातात.

Karnataka School Examination Board
Kolhapur Bandh : अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर कडकडीत बंद; तब्बल 300 कोटींची उलाढाल ठप्प, सर्व घटकांचा आंदोलनाला पाठिंबा

अशा प्रकारे विद्यार्थ्याला दोन परीक्षांमध्ये आपले सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्याय नाही. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी तीन वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Karnataka School Examination Board
Maratha Reservation : आता कुणबी मराठा दाखला मिळणार, पण हवा 'हा' पुरावा; 'असे' मिळवा Caste Certificate

नवीन पॅटर्ननुसार, तिन्ही परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला जाईल. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात कमी गुण मिळाल्यास ते पुन्हा परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याने कोणत्याही परीक्षेत उच्च गुण निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

दहावी संभाव्य परीक्षा वेळापत्रक

परीक्षा दिनांक निकाल

  • परीक्षा १ मार्च १ ते मार्च २५ एप्रिल २२

  • परीक्षा २ मे १५ ते जून ५ जून २१

  • परीक्षा ३ जुलै १२ ते जुलै ३० ऑगस्ट १६

Karnataka School Examination Board
Maratha Reservation : 'कोल्हापुरात सभेसाठी येणाऱ्या अजित पवारांच्या गाडीखाली मी पहिली उडी मारणार'; कोणी दिला इशारा?

बारावी संभाव्य परीक्षा वेळापत्रक

परीक्षा दिनांक निकाल

  • परीक्षा १ मार्च ३० ते एप्रील १५ मे ८

  • परीक्षा २ जून १२ ते जून १९ जून २९

  • परीक्षा ३ जुलै २९ ते ऑगस्ट ५ ऑगस्ट १९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com