

Understanding Problem Solving in Daily Life
Sakal
डी. एस. कुलकर्णी (जीवन कौशल्य प्रशिक्षक)
जरा हटके
या आधीच्या एका लेखात अथर्व किंवा साक्षी यांची बारावीची परीक्षा, आयआयटी प्रवेश परीक्षा दोनदा देऊनही आलेल्या अपयशाची थोडक्यात कहाणी सांगितली होती. आपल्या आयुष्यात समस्या हा अपवाद नाही, नियमच आहे. छोट्या चुका, मोठे अपयश, अचानक येणाऱ्या अडचणी आपल्याला कधी गोंधळात टाकतात, कधी निराश करतात. परंतु प्रत्येक वेळी ‘कोण चुकलं?’ असा विचार करण्यापेक्षा ‘हे का घडलं?’ हा प्रश्न विचारायला शिकवते ‘फिशबोन थेअरी.’ म्हणजेच ‘कॉज अँड इफेक्ट डायग्राम’ ही पद्धत जपानी विचारवंत काओरू इशिकावा यांनी मांडली. माशाच्या हाडांसारखा दिसणारा हा चार्ट, समस्या (इफेक्ट) आणि तिच्यामागील कारणे (कॉज) दाखवतो. प्रत्येक ‘हाड’ हे एका प्रकारच्या कारणाशी संबंधित असतं.