
लेखक: अजय वाधवा, मुख्य कार्यकारी अधिकारी - टीएमएल बिझनेस सर्विसेस
आधुनिक काळात वेगाने बदलत असलेल्या व्यवसाय क्षेत्रात ग्राहकांच्या अपेक्षा तंत्रज्ञान नाविन्यतांप्रमाणे झपाट्याने बदलत आहेत. ज्यामुळे कंपन्यांनी ऑपरेशनल कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे, तसेच सातत्यपूर्ण, उच्च दर्जाचे निकाल देत राहणे आवश्यक आहे. या परिवर्तनासाठी मुख्य पैलू आहे प्रोसेस एक्सलन्स (प्रक्रिया उत्कृष्टता). एकेकाळी बॅक-एण्ड फंक्शन मानले जाणारे प्रोसेस एक्सलन्स आता धोरणात्मक गरज म्हणून उदयास आले आहे, जे कार्यक्षमतेला चालना देत आहे, ग्राहक अनुभव वाढवत आहे आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकता निर्माण करत आहे.