esakal | बारावीनंतर इंजिनिअरींगमध्ये कोणत्या आहेत संधी? जाणुन घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

engineering

भविष्यत नोकरीच्या संधी खूप असणार आहेत. त्यामुळे सर्व पालकांनी ह्या सुवर्ण संधीचा चांगला उपयोग करून अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणे, हा त्यांचा चांगला निर्णय असणार यात काही शंका नाही.

बारावीनंतर इंजिनिअरींगमध्ये कोणत्या आहेत संधी? जाणुन घ्या

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे योग्य राहील, असे प्रश्न मनात सारखे सुरू असतात. त्यामुळे आता अभियांत्रिकी क्षेत्रात कोणत्या संधी आपल्यापुढे आहेत, हे समजून घेऊयात.

आता कोरोना हे वेगळ संकट आपल्यासमोर आहेत. चीनमुळे सर्वच जगावर मोठे संकट आले आहे. यातून चीनवर बहिष्कार घालणे वगैरे गोष्टी सुरू आहेत. पण भारत तर चीनच्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. मग करायचे काय, तर आपण भारतात नवीन कारखाने उभे करून स्वावलंबी बनायचे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतली आणि व्यवस्थित विचार केला, तर असे लक्षात येते कि हे सर्व करायचे असेल, तर आपल्याला भारतात असे तज्ज्ञ हवेत, जे अशी टेकनॉलॉजी तयार करतील. त्यासाठी हे तांत्रिक शिक्षण घेतले पाहिजे. यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यास पुढे प्रचंड स्कोप आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लॉकडाउनमध्ये ऑनलाइन इंटरव्ह्यू देताय? या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा

भारतात भरपूर कंपन्या उभ्या राहतील. त्यासाठी कंपन्यांना अभियंत्यांची गरज लागणारच आहे. बांधकाम करण्यासाठी सिव्हिल इंजिनियर, मशीन डेव्हलपमेंट आणि मेन्टेनन्ससाठी मॅकेनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर, आणि आता तर बऱ्याच मशीन सॉफ्टवेअरने नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअर या सर्वांचीच भविष्यात खूप गरज असणार आहे. म्हणजेच भविष्यत नोकरीच्या संधी  खूप असणार आहेत. त्यामुळे सर्व पालकांनी ह्या सुवर्ण संधीचा चांगला उपयोग करून अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणे, हा त्यांचा चांगला निर्णय असणार यात काही शंका नाही. बारावीनंतर प्रवेश घेताना एकदा या सर्व गोष्टीचा विचार करावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रा. अर्चना साबळे, 
(जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  हडपसर)