लॉकडाउनमध्ये ऑनलाइन इंटरव्ह्यू देताय? या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा

वृत्तसंस्था
Monday, 13 July 2020

प्रत्येक मुलाखत ही एक संधी असते. मात्र, प्रत्येक नोकरीची संधी ही आपल्यासाठी योग्यच आहे, असे नाही. त्यामुळे मुलाखतीची तयारी करताना स्वत:ला आपली कौशल्ये, अनुभव, व्यक्तिमत्व आणि क्षमता माहीत असायला हव्या.

कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे आपण सध्या अभूतपूर्व काळात जगत आहोत. कोरोनामुळे आपल्या दैनंदिन जगण्याच्या पद्धतीवरही परिणाम झाला आहे. सोशल डिस्टन्सिंग नावाची नवीन प्रथा आपल्या आयुष्याचा भाग बनून गेली आहे. (ते कितीजण पाळतात हा भाग वेगळा). 

कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ज्यांच्या आहेत त्यापैकी बरेचजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा जे लॉकडाउनपूर्वी नोकरीच्या शोधात होते, ते सध्या नोकरी शोधत आहेत. मात्र, हे करताना त्यांना ऑनलाइन मुलाखतीला सामोरे जावे लागत आहे. हा ऑनलाइन मुलाखतीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी अगदी साध्यासुद्या तर काही हटक्या टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याच जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकतो. 

भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरजालातील सेवांचा वापर​

आईसब्रेकर प्रश्नांची तयारी
सध्या लॉकडाउन सुरू असल्यामुळे मुलाखतकार तुम्हाला याविषयी प्रश्न विचारू शकतात. लॉकडाउनचा तुम्ही कसा सामना केला? लॉकडाउनमध्ये तुम्ही कसा वेळ घालवला? या काळात तुम्ही काय शिकला? वगैरे. तसेच सध्या काय काम करता किंवा करत होता, कोरोनामुळे देशभरात तसेच जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे तुम्हाला काही आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागला का? ऑफिसमध्ये तसेच इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबतच्या आयडिया, लॉकडाउन आधी वर्क फ्रॉम होम पॉलिसी होती का? यांसारखे प्रश्न विचारू शकतात. 

तयारी महत्त्वाची
प्रत्येक मुलाखत ही एक संधी असते. मात्र, प्रत्येक नोकरीची संधी ही आपल्यासाठी योग्यच आहे, असे नाही. त्यामुळे मुलाखतीची तयारी करताना स्वत:ला आपली कौशल्ये, अनुभव, व्यक्तिमत्व आणि क्षमता माहीत असायला हव्या. याची तयारी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मुलाखत घेणारे अपेक्षा करतात की, आपण आत्मविश्वासाने, स्पष्टपणे आणि आपल्या फॉर्ममधील सीव्हीमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्ञानाने बोलण्यास सक्षम असाल. तसेच तुम्ही तुमची योग्यता कमीत कमी वेळात प्रभावीपणे कशी स्पष्ट करता, आणि इतरांपासून तुम्ही स्वत:ला कसे वेगळे आणि योग्य सिद्ध करता. 

- जपान आणि संधी : असा करा जपानमध्ये व्यवसाय

सराव, सराव आणि सराव 
'प्रॅक्टीस मेक्स परफेक्ट' असं म्हणतात. त्यामुळे ऑनलाइन मुलाखत देण्याआधी तुम्ही स्वत:चा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाहा. एकदा का तुम्हाला तुमच्या तयारीवर विश्वास बसला, की तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. लाइव्ह मुलाखत होणार असल्याने तुमच्या संवादावर विचार करून मुलाखतकार तुम्हाला प्रतिसाद देणार आहे, हे पक्के लक्षात ठेवा. 

टेस्ट करून घ्या
ऐनवेळी गोंधळ नको यासाठी मुलाखतीपूर्वी झूम, स्काइप किंवा सिस्को वेबॅक्स सारख्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरची चाचणी करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे का हेदेखील पाहा. तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरत आहात त्याबद्दलच्या सामान्य तांत्रिक गोष्टींविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कारण कधी कधी चित्र न दिसणे, आवाज न जाणे यांसारखे प्रकार घडू शकतात. 

तसेच तुम्ही मुलाखत देताना ज्या जागी बसणार आहात त्या जागेची पार्श्वभूमी ही शक्यतो प्लेन असणे कधीही चांगले. सामान्य मुलाखतीप्रमाणे या वेळीही तुम्ही मुलाखत देण्याच्या काही मिनिटे आधीपासून आपण मुलाखतीची वाट पाहत आहोत, अशा प्रकारचा आभास निर्माण करता आला पाहिजे. 

पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'​

काय परिधान कराल? 
मुलाखत देताना तरी तुम्ही किमान टापटीप असणे आवश्यक आहे. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीनुसार प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्यामुळे मुलाखत देताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत ही वैयक्तित आवडीची बाब आहे. मात्र, समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे बघून त्याचे लक्ष्य विचलित होईल किंवा अनुचित वाटेल, अशा प्रकारचे कपडे घालू नयेत. 

ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपण जे काम करणार आहोत, त्या क्षेत्राला सूट होईल, अशा प्रकारचा पोशाख परिधान करावा. फॉर्मल कपडे कधीही उत्तम.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Tips for online Interviewing During Lockdown