
Pune : रायसोनी कॉलेजच्या मयूर पाटीलला ॲमेझॉनकडून 45 लाखांचं पॅकेज!
पुणे : वाघोली येथील जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं मोठी झेप घेतली आहे. मयूर पाटील या विद्यार्थ्याला थेट अॅमेझॉनमध्ये घसघशीत पॅकेज मिळालं आहे. ४५ लाखांचं पॅकेज मिळाल्यानं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या मयूरचं सर्वत्र अभिनंद होत आहे. मयूरच्या या यशात प्लेसमेंट अँड ट्रेनिंग कॉलेजच्या सचिन उमरेंचाही महत्वाचा वाटा आहे. (Pune a package of 45 lakhs from Amazon to student of G H Raisoni College of Engineering)
रायसोनी कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे इथं विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन मुलाखती होऊन त्यांची ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, वोडाफोन अशा विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड होत आहे. त्यांना 6 लाखांपासून 45 लाखांची वार्षिक पॅकेजेस मिळाली आहेत. यामध्ये मयूर पाटीलनं यंदा सर्वोच्च पॅकेज मिळवलं आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात कॉलेज इतकाच त्यांच्या कुटुंबाचा देखील वाटा आहे. कॅम्पसमधील माजी विद्यार्थ्यांना देखील कॉलेजमधून वेळोवेळी वेबिनार आयोजित करुन मार्गदर्शन केले जाते.
मयूर पाटीलसह इतर विद्यार्थ्यांच्या या कामगिरीसाठी संस्थेचे मुख्य संचालक सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर, उपसंचालक डॉ. वैभव हेंद्रे, उपसंचालक डॉ. नागनाथ हुल्ले, डीन अकॅडेमिक डॉ. नितीन कोरडे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख सिमरन खियानी, डीन प्लेसमेंट सचिन उमरे आणि सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.